शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

संसदेच्या व्हिडीओ कॉन्फरन्स दरम्यान लघुशंका करताना दिसले खासदार, एकाच महिन्यात दुसरी चूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2021 13:57 IST

ते एकाच महिन्यात दुसऱ्यांदा व्हिडीओ कॉन्फरन्सिंग दरम्यान नग्न दिसून आले. त्यानंतर त्यांनी आपला राजीमाना देण्याचा प्रस्ताव ठेवला.

कॅनडाच्या हाउस ऑफ कॉमन्सचा झूम कॉन्फरन्स कॉल सुर होता. सर्व खासदार आपापले सल्ले-सूचना देत होते आणि आपले विचार मांडत होते. अशातच अचानक एक खासदार झूम कॉलदरम्यान लघुशंका करताना दिसून आला. त्यामुळे एक वेगळ्याच लाजिरवाण्या क्षणाचा सर्वांना सामना करावा लागला. व्हिडीओ कॉन्फरन्स दरम्यान लघुशंका करताना दिसणारे खासदार हे पंतप्रधान जस्टि टूडो यांच्या लिबरल पार्टीचे विलियम अमोस हे होते. ते एकाच महिन्यात दुसऱ्यांदा व्हिडीओ कॉन्फरन्सिंग दरम्यान नग्न दिसून आले. त्यानंतर त्यांनी आपला राजीमाना देण्याचा प्रस्ताव ठेवला.

हाऊस ऑफ कॉमन्सच्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे कामकाजाचा आढावा घेणं सुरू होतं. यादरम्यान पंतप्रधान जस्टिन टूडो यांच्या लिबरल पार्टीचे खासदार विलियम अनोस लघुशंका करताना दिसून आले. विलियम अमोसने गुरूवारी रात्री आपल्या ट्विटरवर एक पोस्ट टाकून लिहिले की, 'मी संसदेच्या कामाकाजादरम्यान लघुशंका करत होतो. तेव्हा मला वाटलं होतं की, माझा कॅमेरा बंद आहे. पण नंतर माझी चूक माझ्या लक्षात आली. मी या माझ्या चुकीसाठी माफी मागतो'.आधीही खासदार नग्न दिसला होता

याआधी एप्रिलमध्येही विलियम अमोस व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे होत असलेल्या संसदेच्या कार्यावेळी नग्न अवस्थेत दिसले होते. तेव्हा व्हर्चुअल सेशन दरम्यान अमोसच्या लॅपटॉपचा कॅमेरा सुरू झाला आणि इतर सदस्यांना तो स्क्रीनवर नग्न अवस्थेत दिसत होता. द कॅनेडियन प्रेसला मिळालेल्या एका स्क्रीनशॉटमद्ये तो डेस्कच्या मागे उभा दिसत आहे. अमोससोबत घडलेली एकाच महिन्यातील ही दुसरी घटना आहे.

त्यांनी माफी मागत ट्विटमध्ये म्हटले होते की, 'मी आज खरंच फार मोठी चूक केली आहे. मी त्यासाठी माफी मागतो. जॉजिंग करून आल्यावर मी वर्कप्लेसमध्येच कपडे बदलत होतो. तेव्हाच माझा कॅमेरा ऑन झाला. मी खरंच मनापासून सभागृहाच्या सर्व सदस्यांची माफी मागतो. ही नकळत झालेली चूक होती. आणि पुन्हा अशी चूक होणार नाही'. 

टॅग्स :CanadaकॅनडाSocial Viralसोशल व्हायरलInternationalआंतरराष्ट्रीय