शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

कॅनडातही पंतप्रधान मोदींचा बोलबाला, 'या' कारणाने पोस्टर लावून करून केलं जातंय कौतुक....

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2021 13:39 IST

PM Narendra Modi : कॅनडामध्ये अनेक ठिकाणी लागले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पोस्टर

ठळक मुद्देकॅनडामध्ये अनेक ठिकाणी लागले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पोस्टरभारतानं केला होता कोरोना प्रतिबंधात्मक लसींचा पुरवठा

कोरोनाच्या महासाथीनं संपूर्ण जगालाच आपल्या कवेत घेतलं आहे. आतापर्यंत कोरोनामुळे लाखो लोकांचे बळी घेतले आहेत. यामुळे संपूर्ण जगात आजही कोरोनाची दहशत आहे. मात्र, आता कोरोनाची लस बाजारात आल्याने जगभरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. जगभरात कोरोना लसीकरणाच्या कार्यक्रमांना सुरूवात करण्यात आली आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी भारतानं कॅनडाला कोरोना प्रतिबंधात्मक लसींचा पुरवठा केला होता. आता कॅनडानं कोरोना प्रतिबंधात्मक लसींचा पुरवाठा केल्याबाबत भारत आणि पंतप्रधाननरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. तसंच स्तुतीही केली आहे. कॅनडामधील ग्रेटर टोरंटो परिसरातील रस्त्यांवर भारत आणि पंतप्रधाननरेंद्र मोदी यांचे आभार मानणारे मोठे पोस्टर्स लावण्यात आले आहेत. कोरोनाच्या महासाथीत भारतानं अनेक देशांना कोरोना प्रतिबंधात्मक लसींचा पुरवठा केला. याबाबत अनेक देशांनी भारताचे आभारही मानले आहेत. भारतानं नुकतंच कॅनडाव्यतिरिक्त नेपाळ आणि बांगलादेशसह अनेक देशांना कोरोना प्रतिबंधात्मक लसींचा पुरवठा केला होता. भारतानं आजवर अनेक देशांना कोरोना प्रतिबंधात्मक लसींचा पुरवठा करत कोरोना महासाथीशी लढण्यास मदत केली आहे. भारतातील सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाच्या कोविशिल्ड लसीचे पाच लाख डोस कॅनडामध्ये पोहोचले आहे. आम्ही पुढील काळातील सहयोगासाठी तत्पर आहोत, असं प्रतिपादन कॅनडाच्या मंत्री अनिता आनंद यांनी केलं होतं. तर दुसरीकडे कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी भारताकडे कॅनडाला कोरोना प्रतिबंधात्मक लसींचा पुरवठा करण्याची विनंती केली होती. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना लसीचा पुरवठा करणार असल्याचं आश्वासन दिलं. कॅनडाची जेवढी मागणी आहे तितक्या लसींचा पुरवठा करण्यास भारत प्रयत्न करणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं होतं.  

ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांनीही मानले होते आभारभारतानं ब्राझीललाही कोरोना प्रतिबंधात्मक लसींच्या २० लाख डोसचा पुरवठा केला होता. त्यानंतर ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जेयर बोलसोनारो यांनी भारताचे आभार मानले होते. त्यांनी भगवान हनुमानाचा संजीवनी बुटी घेऊन जातानाचा फोटो शेअर करत ट्वीट केलं होतं. तसंच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभारही मानले होते.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीprime ministerपंतप्रधानJustin Trudeauजस्टीन ट्रुडोCanadaकॅनडाCorona vaccineकोरोनाची लस