शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

सतत धमकी देणाऱ्या पाकिस्तानची अण्वस्त्रे जप्त होऊ शकतात? राजनाथ सिंह यांच्या 'त्या' विधानाने उपस्थित केला प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2025 11:35 IST

Nuclear Weapons : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानची अण्वस्त्रे आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेच्या (IAEA) देखरेखीखाली घेतली गेली पाहिजेत, असे म्हटले होते. 

जम्मू आणि काश्मीरच्या दौर्‍यावर असलेल्या संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानच्या अण्वस्त्रधारणा धोरणावर गंभीर प्रश्न उपस्थित केला. यावेळी राजनाथ सिंह म्हणाले की, "पाकिस्तानने वेळोवेळी बेजबाबदारपणे अणुहल्ल्याच्या धमक्या दिल्या आहेत. अशा देशाच्या ताब्यात अण्वस्त्रे कितपत सुरक्षित आहेत, हा प्रश्न संपूर्ण जगासमोर उभा राहिला आहे." यासोबतच त्यांनी पाकिस्तानच्या अण्वस्त्रांवर आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्था अर्थात IAEAची देखरेख असावी, अशी मागणी केली. 

संरक्षण मंत्र्यांच्या या वक्तव्याला उत्तर देताना, पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले की, "भारताला रोखण्यासाठी आमच्याकडे सक्षम लष्करी तयारी आहे. आम्हाला अणुहल्ल्याच्या धमक्या देण्याची गरज नाही." मात्र, या पार्श्वभूमीवर एक प्रश्न उपस्थित झाला आहे की,आयएईए म्हणजे नेमकी कोणती संस्था आहे आणि ती कोणत्याही देशाच्या अण्वस्त्रांवर नियंत्रण ठेवू शकते का?

आयएईए म्हणजे काय?

आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्था अर्थात IAEA (International Atomic Energy Agency) ही संयुक्त राष्ट्रांच्या अंतर्गत एक स्वतंत्र संस्था आहे, जी १९५७ साली स्थापन झाली. तिचे मुख्यालय व्हिएन्ना, ऑस्ट्रिया येथे असून, सध्या १७० पेक्षा जास्त देश तिचे सदस्य आहेत. जगभरात अणुऊर्जेचा शांततेसाठी वापर सुनिश्चित करणे, अण्वस्त्रांचा गैरवापर होऊ नये यासाठी तपासणी आणि देखरेख करणे, ऊर्जा, वैद्यकीय, शेती, औद्योगिक क्षेत्रात अणुऊर्जेचा सुरक्षित वापर घडवून आणणे, यासोबतच अणुऊर्जेचा लष्करी वापर होतोय का, हे तपासणे हे या संस्थेचे काम आहे.

अण्वस्त्र प्रसारबंदी करार (NPT) म्हणजे काय?अण्वस्त्र प्रसारबंदी करार अर्थात NPT (Non-Proliferation Treaty) हा एक आंतरराष्ट्रीय करार आहे, जो १९६८मध्ये अस्तित्वात आला. अण्वस्त्रांचा प्रसार थांबवणे, शांततेसाठी अणुऊर्जेचा वापर प्रोत्साहित करणे, आणि अण्वस्त्र निरस्त्रीकरणासाठी प्रयत्न करणे हा याचा उद्देश आहे. सध्या १९१ देश अण्वस्त्र प्रसारबंदी कराराचे सदस्य आहेत. मात्र, भारत, पाकिस्तान आणि इस्रायल देशांनी या करारावर स्वाक्षरी केलेली नाही, त्यामुळे ते या कराराच्या अटींना बंधनकारक मानत नाहीत.

आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेचा अण्वस्त्रांवर अधिकार किती?आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेकडे कोणत्याही देशाची अण्वस्त्रे जप्त करण्याचा किंवा त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार नाही. या संस्थेचे काम फक्त तपासणी, देखरेख आणि अहवाल सादर करणे इतकेच आहे. त्यासाठीही त्यांना संबंधित देशाच्या संमतीची आवश्यकता असते.

जर एखादा देश अण्वस्त्रांच्या धमक्या देत असेल, किंवा त्याच्याकडून अण्वस्त्रांचा गैरवापर होण्याची शक्यता वाटत असेल, तरीही आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्था थेट कारवाई करू शकत नाही. अशावेळी ती संयुक्त राष्ट्रांना यांची माहिती देते. त्यानंतर , संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद त्या विरोधात नियंत्रण, निर्बंध किंवा अन्य उपाययोजना करण्याचा निर्णय घेते.

अण्वस्त्रे काढून घेता येतात का?सध्याच्या आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार कुठल्याही देशाच्या अण्वस्त्रांवर जबरदस्तीने कब्जा करणे किंवा ती जप्त करणे हे शक्य नाही. अशी कोणतीही कारवाई ही युद्धाला कारणीभूत ठरू शकते, आणि यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर गंभीर तणाव निर्माण होऊ शकतो. आजपर्यंत आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेने कुठल्याही देशाची अण्वस्त्रे जप्त केलेली नाहीत.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानnuclear warअणुयुद्धRajnath Singhराजनाथ सिंह