शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेत जाण्याचा प्लान निश्चित नसताना व्हिसासाठी अर्ज करता येतो का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2020 14:42 IST

अमेरिकेच्या टुरिस्ट व्हिसासाठी अर्ज करताना तुमच्याकडे प्रवासाची योजना असणं गरजेचं नाही. अमेरिकेत जाण्याआधी तुम्ही कधीही व्हिसासाठी अर्ज करू शकता. प्रवासाची योजना नक्की होण्याआधीही तुम्हाला व्हिसासाठी अर्ज करता येतो. 

प्रश्न- मी भविष्यात अमेरिकेला जाण्याची योजना आखत आहे. मात्र अद्याप तारीख निश्चित झालेली नाही. मला कुटुंबाला भेटायला अमेरिकेला जायचं आहे. मात्र मी विमानाचं तिकीट काढलेलं नाही. तरीही मी व्हिसासाठी अर्ज करू शकतो का? त्यासाठीच्या मुलाखतीत नेमकी कोणती कागदपत्रं आवश्यक असतात?उत्तर- तुम्ही या स्थितीतही व्हिसासाठी अर्ज करू शकता. अमेरिकेच्या टुरिस्ट व्हिसासाठी अर्ज करताना तुमच्याकडे प्रवासाची योजना असणं गरजेचं नाही. अमेरिकेत जाण्याआधी तुम्ही कधीही व्हिसासाठी अर्ज करू शकता. प्रवासाची योजना नक्की होण्याआधीही तुम्हाला व्हिसासाठी अर्ज करता येतो. कुटुंबातील सदस्याची भेट घेण्यासाठी B-1/B-2 व्हिसा अतिशय योग्य आहे. B-1/B-2 व्हिसासाठी अर्ज करण्याचे तीन टप्पे आहेत. सर्वप्रथम, नॉनइमिग्रंट व्हिसा इलेक्ट्रॉनिक अ‍ॅप्लिकेशन अर्ज (डीएस-१६०) ऑनलाइन भरा. यानंतर व्हिसा अर्जाचं शुल्क भरुन दोन वेगवेगळ्या अपॉईंटमेंट्स घ्या. यातील एक अपॉईंटमेंट व्हिसा अ‍ॅप्लिकेशन सेंटरमध्ये (व्हीएसी) जाऊन तुमचे बायोमेट्रिक्स देण्यासाठी आणि दुसरी अपॉईंटमेंट दूतावास किंवा वकिलातीतल्या मुलाखतीसाठी असेल.मुलाखतीसाठी जास्त कागदपत्रं आणण्याची गरज नाही. अमेरिकन व्हिसा प्रक्रिया कागदपत्रांवर आधारित नसून मुलाखतीवर आधारित आहे. B-1/B-2 व्हिसासाठी मुलाखत देत असताना तुमचा पासपोर्ट आणि डीएस-१६० चं कन्फर्मेशन पेज घेऊन या. अमेरिकेच्या व्हिसा अर्जात तुम्ही अमेरिकेत कुठे जाणार आहेत आणि किती दिवस मुक्काम करणार आहात, याबद्दलचे प्रश्न असतात. यावेळी विमान प्रवासाची आणि हॉटेल मुक्कामाची माहिती देणं अपेक्षित नसतं. पासपोर्ट आणि व्हिसा मिळाल्याशिवाय विमानाची तिकीटं बूक करू नका, असा सल्ला आम्ही अर्जदारांना देतो. व्हिसा अपॉईंटमेंट मिळण्यासाठी लागणारा कालावधी प्रत्येक व्यक्तीसाठी वेगळा असू शकतो. त्यामुळे तुमच्या प्रवासाला पुरेसे दिवस शिल्लक असताना व्हिसासाठी अर्ज करा. B-1/B-2 व्हिसाचा वापर विविध कारणांसाठी केला जाऊ शकतो. यामध्ये कुटुंबाची भेट, सुट्टी, व्यावसायिक परिषदेचा समावेश आहे. एकदा व्हिसा मिळाल्यानंतर तुम्ही मुदत संपेपर्यंत त्याचा वापर करू शकता. तुम्ही वैध व्हिसाचा वापर करुन कितीही वेळा अमेरिकेत जाऊ शकता. कधी कधी प्लान्स बदलू शकतात याची आम्हाला कल्पना आहे. B-1/B-2 व्हिसा काढण्यामागच्या तुमच्या हेतूत बदल झाला तरीही तुम्ही B-1/B-2 व्हिसा परवानगी देत असलेल्या इतर कारणांसाठी अमेरिकेत जाऊ शकता. उदाहरणार्थ, तुम्ही तुमची सुट्टी एक किंवा दोन वर्षांनी पुढे ढकलली, तरीही तुमच्या पासपोर्टची वैधता संपेपर्यंत तुमचा व्हिसा वैध राहतो. सध्या भारतीयांना मिळणाऱ्या B-1/B-2 ची मुदत दहा वर्षे इतकी आहे.