शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
4
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
5
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
6
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
7
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
8
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
9
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
10
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
11
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
12
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
13
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
14
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
15
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
16
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
17
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
18
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
19
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
20
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर

स्टीफन हॉकिंग्ज यांच्या पीएचडी प्रबंधामुळे क्रॅश झाली केंब्रिजची वेबसाइट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2017 10:17 IST

कृष्णविवराबद्दल सखोल मांडणी करणारे स्टीफन हॉकिंग्ज या आठवड्यात नव्याने चर्चेमध्ये आले आहेत.

ठळक मुद्दे कृष्णविवराबद्दल सखोल मांडणी करणारे स्टीफन हॉकिंग्ज या आठवड्यात नव्याने चर्चेमध्ये आले आहेत. स्टीफन यांच्या पीएचडीचा प्रबंध केंब्रिज विद्यापीठाने संकेतस्थळावर टाकताच जगभरातील विद्यार्थी, संशोधक आणि विचारवंत त्यावर अक्षरशः तुटून पडले. प्रबंध वाचण्यासाठी लाखो लोकांनी संकेतस्थळ उघडल्याने केंब्रिज विद्यापिठाचे संकेतस्थळच क्रॅश झालं .

लंडन- कृष्णविवराबद्दल सखोल मांडणी करणारे स्टीफन हॉकिंग्ज या आठवड्यात नव्याने चर्चेमध्ये आले आहेत. स्टीफन यांच्या पीएचडीचा प्रबंध केंब्रिज विद्यापीठाने संकेतस्थळावर टाकताच जगभरातील विद्यार्थी, संशोधक आणि विचारवंत त्यावर अक्षरशः तुटून पडले. प्रबंध वाचण्यासाठी लाखो लोकांनी संकेतस्थळ उघडल्याने केंब्रिज विद्यापिठाचे संकेतस्थळच क्रॅश झालं .

1966 साली स्टीफन यांनी "प्रॉपर्टीज ऑफ एक्स्पांडिग युनिवर्सेस" हा प्रबंध लिहिला होता. त्या प्रबंधास  लिहून ५० वर्षे उलटून गेल्यानंतर तो संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याचा निर्णय केंब्रिजने घेतला. त्यानंकर मिळालेल्या प्रतिसादाबद्दल बोलताना विद्यापीठाचे प्रवक्ते स्टुअर्ट रॉबर्ट म्हणाले, "हा प्रबंध संकेतस्थळावर टाकण्याच्या निर्णयाला जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. 24 तासांच्या अवधीमध्ये हा प्रबंध 60 हजार लोकांनी डाऊनलोड केला, त्यामुळे संकेतस्थळाची गती कमी झाली असून काहीवेळेस वाचकांना वेबपेज तात्पुरतं उपलब्ध नाही' असा संदेश येत आहे."

"हा प्रबंध वाचण्यासाठी लोकांनी दाखवलेला उत्साह आनंददायी असून तो संकेतस्थळावर वाचल्यावर त्यांची निराशा होणार नाही अशी मी आशा बाळगतो,अशी गंमतीदार प्रतिक्रिया हॉकिंग्ज यांनी संकेतस्थळ क्रॅश होण्यापुर्वी दिली होती. विद्यापिठानेही लोकांच्या या प्रतिसादाबद्ल आनंद व्यक्त केला असून या निर्णयामुळे नव्या विद्यार्थ्यांना, संशोधकांना प्रेरणा मिळेल अशी आशा व्यक्त केली आहे.

कोण आहेत स्टीफन हॉकिंग्ज ?

हॉकिंग्ज यांचा जन्म ८ जानेवारी १९४२ साली इंग्लंडमध्ये ऑक्सफर्ड येथे झाला. हॉकिंग्ज एनर्जी, हॉकिंग्ज रेडिएशन यांसह अनेक शोधांसाठी ते प्रसिद्ध आहेत. हॉकिंग्ज यांची ब्रिफ हिस्टरी ऑफ टाइम, ब्लॅक होल अॅन्ड बेबी युनिवर्सेस अन्ड इदर एसेज, द युनिवर्स इन नटशेल, ऑन द शोल्डर्स ऑफ जायंटस यासारखी अनेक पुस्तकं प्रसिद्ध आहेत. भौतिकशास्त्रातले जगातील अत्यंत मानाचे व मोठे पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत.२००१ साली टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च या मुंबईतील विज्ञानक्षेत्रातील संशोधन संस्थेने आयोजीत केलेल्या 'स्ट्रींग' या परिषदेसाठी त्यांना आमंत्रित केलं होतं. त्या परिषदेत हॉकिंग्ज यांनी दिलेलं व्याख्यान प्रसिद्ध आहे. टीआयएफआरने त्यांना सरोजिनी दामोदरन फेलोशिपही दिली आहे.