शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

Calling A Man Bald is Crime : खबरदार! टक्कलवरून कोणाला काही बोलाल तर...ते लैंगिक शोषण ठरते; ब्रिटनच्या न्यायालयाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2022 12:58 IST

यॉर्कशायरमधील एक कंपनीत खटला दाखल करणारा कर्मचारी २४ वर्षे काम करत होता, गेल्या वर्षी त्याला कंपनीने कामावरून काढून टाकले होते. यानंतर तो न्यायालयात गेला होता.

एखाद्या व्यक्तीला त्याच्या टक्कल पडण्यावरून बोलले जाते, ऑफिसमध्ये, मित्रांमध्ये खिल्ली उडविली जाते, असे केल्यास ब्रिटनमध्ये मोठा गुन्हा मानला जाणार आहे. ब्रिटनच्या न्यायालयाने यास लैंगिक शोषण असे म्हटले आहे. इंप्लॉयमेंट ट्रिब्यूनलने एका प्रकरणात हा निर्णय दिला आहे. 

एक कर्मचारी टोनी फिन हा त्याला टकला म्हणत असल्याची तक्रार घेऊन न्यायालयात गेला होता. यॉर्कशायरमधील एक कंपनीत तो २४ वर्षे काम करत होता, गेल्या वर्षी त्याला कंपनीने कामावरून काढून टाकले होते. यानंतर तो न्यायालयात गेला होता. कंपनीवर खटला दाखल करताना टोनीने त्यात लैंगिक शोषणाचा दावाही केला आहे. डेलीमेलने दिलेल्या वृत्तानुसार टोनीने दाव्यात म्हटले की, फॅक्टरी सुपरवायझर जॅमी किंगने एका घटनेवेळी लैंगिक शोषण केले होते. काम करत असताना जॅमीने त्याला टकला म्हणत शिवी दिली होती. यावर न्यायाधीशांनी म्हटले की, महिलांच्या तुलनेत पुरुषांचे केस जास्त गळतात. यामुळे कोणत्याही व्यक्तीला या शब्दाचा वापर करणे हे भेदभाव केल्यासारखेच आहे. 

तीन सदस्यांच्या एका पॅनलने या प्रकरणी आपला निर्णय दिला. एखाद्या व्यक्तीला टकला म्हणणे हे एखाद्या स्त्रीच्या ब्रेस्टवर टिपण्णी करण्यासारखे आहे, असे न्यायालयाने म्हटले. टक्कलावर बोलणे हे केवळ अपमानच नाही तर प्रत्यक्षात ते लैंगिक शोषण असल्याचे न्यायाधीश जोनाथन ब्रेन यांनी म्हटले. "आमच्या निकालात, 'टक्कल' हा शब्द आणि सेक्सचे संरक्षित वैशिष्ट्य यांच्यात परस्परसंबंध आहे," असे पॅनेलने म्हटले आहे.

फिनसाठी टक्कल हा शब्द वापरणे ही अपमानास्पद प्रथा असल्याचे, यामुळे फिनच्या प्रतिष्ठेला धक्का बसला असून त्याच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. आम्हाला ते लैंगिकतेशी संबंधित आढळली, असे न्यायालयाने म्हटले आहे.