शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
'आमच्याकडे सर्वाधिक अणुबॉम्ब, पृथ्वी 150 वेळा नष्ट होईल', डोनाल्ड ट्रम्पचा यांचा धक्कादायक दावा
3
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
4
Gold Silver Price 3 Nov: सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा बदल; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट Gold चे लेटेस्ट रेट
5
पाकिस्तानने अण्वस्त्रचाचणी केली, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
6
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
7
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
8
Tulasi Vivah 2025: तुलसी विवाहासाठी रामा तुळस योग्य की श्यामा? जाणून घ्या मुख्य भेद 
9
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
10
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
11
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास
12
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
13
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
14
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
15
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
16
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
17
पाकिस्तानबद्दल एक गोष्ट सांगून डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचं टेंशन वाढवलं? असं काय म्हणाले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष?
18
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
19
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...

पैसे चुकवले नाही तर संपत्ती जप्त करू; ब्रिटीश कंपनीची भारताला धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2021 17:15 IST

आंतरराष्ट्रीय न्यायाधिकरणात भारताच्या विरोधात निर्णय, कंपनीला १.२ अब्ज डॉलर्स चुकवण्याचे भारताला आदेश

ठळक मुद्देआंतरराष्ट्रीय न्यायाधिकरणात भारताच्या विरोधात निर्णयकंपनीला १.२ अब्ज डॉलर्स चुकवण्याचे भारताला आदेश

काही दिवसांपूर्वी ब्रिटनच्या केयर्न एनर्जी या कंपनीनं भारत सरकारविरोधातील खटला जिंकला आहे. न्यायालयाच्या निर्णयानुसार भारत सरकारला केयर्न एनर्जीला काही रक्कम चुकवावी लागणार आहे. यादरम्यान, ब्रिटनच्या या कंपनीनं भारत सरकारला इशारा देत जर वेळेत रक्कम चुकवली नाही तर कंपनी भारताची परदेशातील संपत्ती जप्त करेल अशी धमकी दिली आहे. दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यामध्ये विमान आणि जहाज कंपनी जप्त करू शकते असं सांगण्यात आलं आहे.आंतरराष्ट्रीय न्यायाधिकरणात कंपनीनं जो खटला जिंकला आहे त्यात भारतानं कंपनीकडून पूर्वलक्षी प्रभावानं कराच्या रूपयात १०,३४७ कोटी रूपये मागितले होते. परंतु न्यायाधिकरणानं निकाल हा केयर्नच्या बाजूनं दिला आहे. रॉयटर्सनं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. "ब्रिटन-भारत द्विपक्षीय गुंतवणूक कराराअंतर्गत भारतानं केयर्नवरील आपल्या जबाबदाऱ्यांचं उल्लंघन केलं असून नुकसान भरपाई आणि व्याजापोटी कंपनीला १.२ अब्ज डॉलर्स द्यावे लागतील," असं न्यायाधीकरणानं निर्णय दिला असल्याचं केयर्ननं म्हटलं आहे. कंपनीनं दिला इशाराब्रिटनच्या केयर्न एनर्जीनं भारत सरकारला इशारा देत जर भारतानं न्यायाधिकरणाचा आदेश मानला नाही तर विदेशातील भारताची संपत्ती ताब्यात घेतली जाऊ शकते असं म्हटलं आहे. दरम्यान, कोणती संपत्ती जप्त केली जाऊ शकते याची माहितीदेखील घेण्यास कंपनीनं सुरूवात केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार यात विमानं आणि जहाजांचा समावेश असू शकतो. तीन महिन्यांत दुसरा झटका सरकारला तीन महिन्यांमध्ये दुसरा झटका लागला आहे. यापूर्वी आंतरराष्ट्रीय न्यायालयानं व्होडाफोनविरोधातील खटल्यात भारताच्या विरोधात निर्णय दिला होता. दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या न्यायाधिकरणाच्या तीन सदस्यीयांमध्ये भारत सरकारद्वारे नियुक्त केलेल्या न्यायाधीशांचाही समावेश आहे. २००६-०७ मध्ये केयर्नद्वारे आपल्या भारतातील व्यापाराची पुनर्रचना करण्यात आली होती. यावर भारत सरकारनं केलेला १०,२४७ कोटी रूपयांचा दावा वैध नसल्याचं न्यायाधीकरणानं म्हटलं. न्यायाधिकरणाने भारत सरकारला केर्नला लाभांश, कर परताव्यावरील स्थगिती आणि व्याजासह थकबाकी वसूल करण्यासाठी समभागांच्या आंशिक विक्रीवरील व्याज परत करण्यास सांगितलं आहे. दरम्यान, या वृत्ताला केयर्ननंदेखील दुजोरा दिला आहे. तसंच न्यायाधिकरणानं हा निर्णय आपल्या बाजूनं दिली असल्याची माहितीही त्यांनी दिली. 

टॅग्स :IndiaभारतTaxकरInternationalआंतरराष्ट्रीयCourtन्यायालयVodafoneव्होडाफोन