शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

मेक्सिकोमध्ये बस आणि ट्रकची भीषण धडक, अपघातानंतर बसला लागली आग, ४१ जणांचा जळून कोळसा   

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2025 10:29 IST

Mexico Bus Accident: मेक्सिकोमध्ये बस आणि ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातानंतर लागलेल्या आगीत ४१ जणांचा जळून मृत्यू झाला. ही दुर्घटना शनिवारी सकाळी मेक्सिकोमधील दक्षिणेकडील राज्य असलेल्या तबास्को येथे घडली.

मेक्सिकोमध्ये बस आणि ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातानंतर लागलेल्या आगीत ४१ जणांचा जळून मृत्यू झाला. ही दुर्घटना शनिवारी सकाळी मेक्सिकोमधील दक्षिणेकडील राज्य असलेल्या तबास्को येथे घडली. बस आणि ट्रकमध्ये समोरासमोर धडक होऊन हा भीषण अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

या अपघाताबाबत मेक्सिको सरकारने दिलेल्या माहितीनुसार बसमधून ४८ प्रवासी प्रवास करत होते. त्यापैकी ३८ प्रवासी आणि बसचे दोन्ही ड्रायव्हर यांचा या अपघातानंतर लागलेल्या आगीत जळून मृत्यू झाला. तसेच ट्रक ड्रायव्हरचाही या अपघातात मृत्यू झाला. हा अपघात एवढा भीषण होता की, बस आणि ट्रकमध्ये  धडक झाल्यानंतर लागलेल्या आगीत संपूर्ण बस जळून खाक झाली. तसेच बसचा केवळ सांगाडा शिल्लक राहिला.

दरम्यान, अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या लोकांपैकी १८ जणांची ओळख पटवण्यात यश आलं आहे. मात्र मृतदेह ओळखण्यापलिकडे गेले आहेत. दरम्यान, अपघातग्रस्त बसच्या संचालक कंपनीने अपघाताबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. हा अपघात कसा झाला आणि अपघात झाला तेव्हा बस वेगमर्यादेमध्ये होती का? याचा तपास अधिकाऱ्यांसोबत मिळून करण्यात येत असल्याचे कंपनीने सांगितले आहे.  

टॅग्स :AccidentअपघातMexicoमेक्सिकोInternationalआंतरराष्ट्रीय