शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अब्जावधी रुपयांच्या गाड्या जळून खाक; मालवाहू जहाजाला प्रवासादरम्यान आग

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2022 07:27 IST

एका बेंटले कारची किंमत ३ कोटी रुपयांपासून पुढे आहे. त्यामुळे जवळपास ५०० ते ६०० कोटींच्या १८९ कार जळून खाक झाल्या आहेत

कोरोना महामारीमुळे वाहन उद्योगाची स्थिती नाजूक आहे. कोरोनाचा सर्वाधिक परिणाम पुरवठा साखळीवर झाला. कंपन्यांना वाहने पोहोचवणे सर्वात कठीण जात होते. अशात वाहन उद्योगाचे कंबरडे मोडणारी आणखी एक घटना समोर आली आहे. अब्जावधी रुपयांच्या आलिशान गाड्यांनी भरलेले एक मालवाहू जहाज गुरुवारी अटलांटिक महासागरात जळाले.

कोट्यवधींच्या कार खाकएका बेंटले कारची किंमत ३ कोटी रुपयांपासून पुढे आहे. त्यामुळे जवळपास ५०० ते ६०० कोटींच्या १८९ कार जळून खाक झाल्या आहेत. एक मालवाहू जहाज जर्मनीहून अटलांटिक महासागरावाटे अमेरिकेत घेऊन जात होते. फेलिसिटी एस नावाच्या या मालवाहू जहाजाला भर समुद्रात अचानक भीषण आग लागली. आग एवढी भीषण होती की, जहाजावरील सर्व वाहने आणि इतर साहित्य जळून खाक झाले. सुदैवाने जहाजावीरल २२ क्रू मेंबर्स बचावले.

कोणती किती वाहने होती?

४,००० फोक्सवॅगन कंपनीच्या कार

१८९ फोक्सवॅगनची बेंटले

११०० पोर्शे कार एका पोर्शे  कारची किंमत १ कोटीच्या आसपास आहे. अशा ११०० कार जळाल्या आहेत. त्यांची किंमत ११०० कोटी रुपयांच्या आहे.

यापूर्वी घडले असेच२०१९ मध्येही असेच घडले होते. ग्रँड अमेरिका हे मालवाहू जहाज २००० लग्झरी कार घेऊन निघाले होते. त्या जहाजाला आग लागली आणि ते पाण्यात बुडाले. त्यातही पोर्शे, ऑडी अशा अलिशान गाड्या होत्या. 

टॅग्स :fireआग