शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
6
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
7
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
8
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
9
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
10
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
11
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
12
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
13
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
14
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
15
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
16
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
17
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
18
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
19
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
20
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'

वॉरेन बफेंच्या नव्या कंपनीचे सीईओ डॉ. अतुल गावंडे आहेत तरी कोण?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2018 4:28 PM

अमेरिकेतील लोकांना अत्यल्प दरात उत्तम वैद्यकीय सेवा मिळाव्यात, या उद्देशाने या तिन्ही कंपन्या एकत्र आल्या आहेत.

बोस्टन : अमेझॉन, बर्कशायर हॅथवे व जेपी मॉर्गन या जगातील तीन बड्या कंपन्यांनी एकत्र येऊन सुरू केलेल्या हेल्थकेअर कंपनीची धुरा डॉ. अतुल गावंडे या ५२ वर्षांच्या मराठी व्यक्तीकडे सोपविली आहे. अतुल गावंडे यांची मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात येत असल्याची घोषणा बुधवारी करण्यात आली. या तिन्ही कंपन्यांनी बुधवारी गावंडे यांची मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्ती केली आहे.अमेरिकेतील लोकांना अत्यल्प दरात उत्तम वैद्यकीय सेवा मिळाव्यात, या उद्देशाने या तिन्ही कंपन्या एकत्र आल्या आहेत. तसे त्यांनी पत्रकार परिषदेतच जाहीर केले. या नव्या कंपनीचे मुख्यालय बोस्टनमध्ये असेल. पेशाने डॉक्टर असलेले अतुल गावंडे एंडोक्राइन सर्जन आहेत. ते हार्वर्ड टीएन चान स्कूल आॅफ पब्लिक हेल्थमध्ये आरोग्य धोरण व व्यवस्थापन विभागात प्राध्यापक असून, हार्वर्ड मेडिकल स्कूलमध्ये सर्जरीचे प्राध्यापक आहेत.कमी खर्चात चांगल्या आरोग्य व वैद्यकीय सेवा देणे शक्य आहे, असे आम्हाला वाटते. त्यामुळे ना नफा तत्वावर आम्ही ही कंपनी सुरू करीत आहोत, असे बर्कशायर हॅथवेचे सीईओ वॉरन बफे यांनी स्पष्ट केले. डॉ. गावंडे या कामात आम्हाला यश मिळवून देतील, अशी खात्तीही त्यांनी व्यक्त केली.डॉ. अतुल गावंडे अनेक वर्षे अशाच प्रकारच्या प्रकल्पांसाठी काम करीत असून, अमेरिकेतील वैद्यकीय उपचार, आरोग्य व त्यावरील खर्च यावर त्यांनी अनेकदा सडकून टीकाही केली आहे. अतुल गावंडे जसे डॉक्टर म्हणून प्रख्यात आहेत, तसेच आरोग्यविषयक वृत्तपत्र लिखाण व अन्य संशोधन यांमुळे त्यांच्या क्षेत्रातील आदरणीय व्यक्ती आहेत. डॉ. गावंडे यांचे आई-वडील अनेक वर्षांपूर्वी अमेरिकेत गेले. अतुल यांचा जन्मही अमेरिकेतीलच आहे. त्यामुळे त्यांना भारतीय वंशाचे अमेरिकन म्हणता येईल. (वृत्तसंस्था)ओबामा केअरमध्ये सहभागमाजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्याशी त्यांचे उत्तम संबंध होते. अमेरिकेत राबवण्यात आलेल्या ओबामा केअर या आरोग्य योजनेमध्ये डॉ. गावंडे यांचा मोठा वाटा होता. डोनाल्ड ट्रम्प यांनी ती बंद केली. मात्र ओबामा केअरच्या आधारे भारतात सुरू होत असलेली आयुष्मान योजना आता मोदीकेअर नावाने ओळखली जात आहे. 

टॅग्स :AmericaअमेरिकाHealthआरोग्यDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पdocterडॉक्टर