शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

वडील जगातील सर्वात श्रीमंत सुल्तान, आता पुत्र करतोय सामान्य तरुणीशी लग्न, कोण आहे ती नशिबवान मुलगी? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2024 15:21 IST

Brunei Prince Abdul Mateen Marriage: देशावर सर्वाधिक काळ राज्य करणारे  ब्रुनोईचे सुल्तान हसनल बोलकियाह यांचा मुलगा प्रिंस अब्दुल मतीन हे आज लग्न करणार आहेत. ३२ वर्षीय राजपुत्र अब्दुल मतीन हे २९ वर्षीय यांग मुलिया अनीशा रोस्ना हिच्यासोबत विवाहबद्ध होणार आहेत.

देशावर सर्वाधिक काळ राज्य करणारे  ब्रुनोईचे सुल्तान हसनल बोलकियाह यांचा मुलगा प्रिंस अब्दुल मतीन हे आज लग्न करणार आहेत. ३२ वर्षीय राजपुत्र अब्दुल मतीन हे २९ वर्षीय यांग मुलिया अनीशा रोस्ना हिच्यासोबत विवाहबद्ध होणार आहेत. हा लग्नसोहळा सेरी बेगवानमध्ये सोन्याचा घुमट असलेल्या मशिदीत आयोजित करण्यात आला आहे. हा सोहळा इस्लामिक पद्धतीने होणार आहे. तसेच या विवाहसोहळ्यानिमित्त ब्रुनोईमध्ये १० दिवसीय भव्य सोहळा  आयोजित करण्यात आला आहे.  

युवराज मतीन हे जगातील दीर्घकाळ राज्य करणारे राजे असलेल्या सुल्तान हसनल बोकलिया यांचे दहावे  पुत्र आहेत. त्यामुळे ब्रुनोईचे राजे बनण्याच्या क्रमवारीत ते खूप मागे आहेत. त्यामुळे ते सुल्तान बनण्याची शक्यता फारच कमी आहे. तर प्रिंस मतीन यांची होणारी पत्नी ही कथितपणे फॅशन आणि टुरिझम व्यवसायाची मालकीण आहे. यांग मुलिया अनीषा रोस्ना हिचे आजोबा हे युवराज मतीन यांचे वडील म्हणजेच ब्रुनोईच्या विद्यमान सुल्तानांचे प्रमुख सल्लागार राहिले आहेत.

युवराज मतीन हे ब्रुनोईमधील हेलिकॉप्टर पायलट आहेत. तसेच प्रसारमाध्यमांमधून त्यांची तुलना ही ब्रिटनचे प्रिंस हॅरी यांच्याशी केली जाते. आधी त्यांना हॉट रॉयल म्हटलं जात असे.  सोशल मीडियावर त्यांचा जबरदस्त चाहतावर्ग आहे. तसेच ते त्यांच्या लूकमुळे अधिकच प्रसिद्ध झालेले आहेत.

शाही विवाहसोहळ्याच्या आनंदोत्सवासाठी १७८८ खोल्या असलेल्या महालामध्ये एक शानदार समारंभ आयोजित करण्यात आला आहे.  विवाहानंतर रविवारी एक मोठी मिरवणूक  निघणार आहे. या शाही विवाहसोहळ्यामध्ये शाही पाहुणे आणि दिग्गज नेते सहभागी होण्याची शक्यता आहे.  

टॅग्स :marriageलग्नInternationalआंतरराष्ट्रीय