लंडन- लंडनमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. लंडनमधल्या एका शवागारात घुसून महिलेच्या मृतदेहाबरोबर शारीरिक संबंध प्रस्थापित करताना एका तरुणाला रंगेहाथ पकडण्यात आलं. त्या तरुणाची 6 वर्षांसाठी तुरुंगात रवानगी केली आहे. या प्रकरणावर बर्मिंगहॅममधल्या न्यायालयात सुनावणी करणाऱ्या न्यायाधीशांनीही घटनेचा निषेध नोंदवला आहे. हा तरुण चोरी करत असल्याची माहितीही पोलिसांनी दिली आहे.कासिम खुर्रमकडून करण्यात आलेल्या कृत्यानं सर्व मानवी मर्यादा ओलांडल्या असून, अतीव दुःख झाल्याचंही न्यायाधीशांनी सांगितलं आहे. पोलिसांनी त्या तरुणाला अटक करून न्यायालयात हजर केले असता, न्यायालयानं त्याला 6 वर्षांचा तुरुंगवास ठोठावला आहे. जेव्हा पोलिसांनी त्या तरुणाला अटक केली, त्यावेळी तो दारूच्या नशेत होता. तसेच त्यानं कृत्रिम भांगेचंही सेवन केलं होतं.स्थानिक न्यायालयात तो 23 वर्षांचा तरुण मृतदेहाबरोबर शारीरिक संबंध ठेवताना दोषी आढळला आहे. त्या तरुणानं तीन मृतदेह छिन्नविछिन्न करत 9 शवपेटी तोडल्या आहेत. न्यायाधीशांनी सुनावणीदरम्यान 9 मृतदेहांबरोबर दृष्कृत केल्याचा त्या तरुणावर ठपका ठेवला आहे. दोषी तरुणाला तुरुंगात टाकलं असून, केलेल्या कृत्याची त्याला लाज वाटत असल्याची माहिती त्या तरुणाच्या वकिलांनी दिली आहे.
धक्कादायक! शवागारात घुसून चोरानं बनवले मृतदेहाबरोबर शारीरिक संबंध
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2019 11:33 IST
लंडनमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे.
धक्कादायक! शवागारात घुसून चोरानं बनवले मृतदेहाबरोबर शारीरिक संबंध
ठळक मुद्देलंडनमधल्या एका शवागारात घुसून महिलेच्या मृतदेहाबरोबर शारीरिक संबंध प्रस्थापित करताना एका तरुणाला रंगेहाथ पकडण्यात आलं.त्या तरुणाची 6 वर्षांसाठी तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे. कासिम खुर्रमकडून करण्यात आलेल्या कृत्यानं सर्व मानवी मर्यादा ओलांडल्या असून, अतीव दुःख झाल्याचंही न्यायाधीशांनी सांगितलं