लंडन : ब्रिटनचे राजे चार्ल्स तिसरे यांचे धाकटे बंधू आणि माजी राजपुत्र अँड्र्यू माउंटबॅटन-विंडसर यांना गुरुवारी ब्रिटनच्या पोलिसांनी सार्वजनिक पदावर असताना गैरवर्तन केल्याच्या संशयावरून अटक केली.
लैंगिक गुन्हेगार जेफ्री एपस्टीनशी असलेल्या त्यांच्या संबंधांबाबत झालेल्या धक्कादायक आरोपांनंतर ही कारवाई करण्यात आली आहे. अँड्र्यू यांचा गुरुवारी ६६ वा वाढदिवस होता.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
या अटकेबाबत ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी ‘बीबीसी’शी बोलताना स्पष्ट केले की, कोणीही व्यक्ती कायद्यापेक्षा मोठी नाही. ज्याच्याकडे कोणतीही संबंधित माहिती असेल, मग ते अँड्र्यू असोत किंवा इतर कोणीही, त्यांनी पुढे येऊन ती यंत्रणांना दिली पाहिजे. आपल्या व्यवस्थेचे मुख्य तत्त्व हेच आहे की कायद्यासमोर सर्व समान आहेत.
ब्रिटनच्या कायद्यानुसार, सार्वजनिक पदाचा गैरवापर केल्याचा संशय असेल, तर अटक केली जाते. बकिंगहॅम पॅलेसने यापूर्वीच पोलिसांशी सर्व प्रकारचे सहकार्य केले जाईल, असे आश्वासन दिले होते.
कायद्यानुसारच तपास होईल
अँड्र्यू माउंटबॅटन-विंडसर आणि सार्वजनिक पदावरील गैरवर्तणुकीच्या संशयाशी संबंधित हे वृत्त चिंताजनक आहे. या प्रकरणाची संपूर्ण, निष्पक्ष आणि योग्य प्रक्रियेद्वारे चौकशी केली जाईल आणि संबंधित यंत्रणांद्वारे हे प्रकरण योग्य पद्धतीने हाताळले जाईल. या प्रक्रियेत त्यांना आमचा पूर्ण आणि पाठिंबा व सहकार्य राहील. कायदा आपले काम करेल.
चार्ल्स, ब्रिटनचे राजे
पार्श्वभूमी : अँड्र्यू यांचे नाव एपस्टिन फाइल्समध्ये आल्यानंतर किंग चार्ल्स यांनी गेल्याच वर्षी अँड्र्यू यांच्या ‘प्रिन्स’ आणि ‘ड्यूक ऑफ यॉर्क’ या पदव्या काढून घेतल्या होत्या. अँड्र्यू यांनी एपस्टिन प्रकरणासंबंधी स्वतःवरील सर्व आरोप सुरुवातीपासूनच फेटाळून लावले आहेत.
Web Summary : Prince Andrew was arrested for alleged misconduct while in public office related to his ties with Jeffrey Epstein. Prime Minister Starmer emphasized that no one is above the law, ensuring a thorough investigation.
Web Summary : प्रिंस एंड्रयू को जेफरी एपस्टीन से संबंधों के चलते सार्वजनिक पद पर रहते हुए कथित दुर्व्यवहार के आरोप में गिरफ्तार किया गया। प्रधानमंत्री स्टार्मर ने जोर देकर कहा कि कोई भी कानून से ऊपर नहीं है, और पूरी जांच सुनिश्चित की जाएगी।