शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

Britain Election: ऋषी सुनक यांचे स्वप्न भंगणार? लिज ट्रस होऊ शकतात ब्रिटनच्या पंतप्रधान! जाणून घ्या कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2022 21:22 IST

Britain Election:भारतीय वंशाचे ऋषी सुनक ब्रिटनचे पंतप्रधान होण्याच्या शर्यतीत आघाडीवर आहेत, पण आता त्यांच्यासाठी पुढचा रस्ता आणखी कठीण होणार आहे.

Britain Election: भारतीय वंशाचे ऋषी सुनक ब्रिटनचे पंतप्रधान होण्याच्या शर्यतीत आघाडीवर आहेत, पण आता त्यांच्यासाठी पुढचा रस्ता आणखी कठीण होणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, असेही बोलले जात आहे की, ऋषी सुनक यांचे पंतप्रधान बनण्याचे स्वप्न भंग होऊ शकते आणि लिज ट्रस ब्रिटनच्या पंतप्रधान होऊ शकतात. बोरिस जॉन्सन सरकारमध्ये अर्थमंत्री राहिलेल्या सुनक यांना आता टोरी सदस्यांमध्ये खूप कठीण मतदान प्रक्रियेचा सामना करावा लागणार आहे.

इतक्या मतांची आवश्यकतापंतप्रधानांच्या खुर्चीपर्यंत पोहोचण्यासाठी सुनक यांना आता अंदाजे 160,000 कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या मतदारांना आपल्या बाजूने पोस्टल मतपत्र देण्यासाठी तयार करावे लागेल. पंतप्रधान होण्याच्या शर्यतीत सुनक आणि ट्रस हे दोनच दावेदार उरले आहेत. सोमवारी बीबीसीवर दोघांमध्ये थेट चर्चा होणार आहे. या चर्चेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यानंतर पोस्टल बॅलेटवर मतदान होईल आणि 5 सप्टेंबरला ब्रिटनचा पुढचा पंतप्रधान कोण होणार हे कळेल.

रशिया-युक्रेन युद्धावर स्पष्ट मतपुराणमतवादी मतदार आणि इतर राजकारण्यांमध्ये लिज ट्रस यांची लोकप्रियता प्रचंड आहे. रशिया-युक्रेन युद्धाबाबतही त्यांची भूमिका स्पष्ट आणि ठाम राहिली आहे. परराष्ट्र सचिव म्हणून व्लादिमीर पुतिन यांना युद्धासाठी जबाबदार धरण्यात त्या यशस्वी ठरल्या आहेत. त्यामुळेच त्यांची प्रतिमा लोकांमध्ये आणखी मजबूत झाली आहे. 

बोरिस जॉन्सन यांचे आवाहनदुसरीकडे माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी सुनकऐवजी कुणालाही साथ द्या असे आवाहन केले आहे. जॉन्सन सरकारच्या पहिल्या दोन वर्षांत ट्रस आंतरराष्ट्रीय व्यापार सचिव होत्या. त्यांनी ब्रेक्झिटला पाठिंबा दिला, तसेच गेल्या वर्षी त्यांना युरोपियन युनियनशी चर्चेसाठी देशाचे मुख्य वार्ताकार म्हणून नियुक्त केले गेले. ट्रस पार्टी सदस्यांच्या निवडणुकीत नेहमीच आघाडीवर राहिल्या आहेत.

अंतिम लढत रंगणारऋषी सुनक हे कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे सदस्य आहेत. नॉर्थ यॉर्कशायरमधील रिचमंड (यॉर्क) मतदारसंघातून 2015 मध्ये खासदार झाले. 2019-2020 दरम्यान त्यांनी मुख्य कोषागार सचिव म्हणून काम पाहिले. त्यानंतर फेब्रुवारी 2020 मध्ये ते ब्रिटनचे अर्थमंत्री झाले. आता ऋषी सुनक पंतप्रधानपदाच्या शर्यतीत अंतिम टप्प्यात आले आहेत. पण, येथे त्यांना परराष्ट्र मंत्री लिझ ट्रस यांचा सामना करावा लागणार आहे. 

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयElectionनिवडणूकInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्स