शहरं
Join us  
Trending Stories
1
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
2
'राहुल गांधींचं काम केलं, तुमचं नाही केलं तर लोक म्हणतील...'; नितीन गडकरींनी प्रियंका गांधींना खाऊ घातली स्पेशल डिश
3
देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
4
आज होणार धमाका! महिलेच्या शरीरावर कांदबरीतील ओळीचं लिखाण, १८ वर्षीय मुलीचा 'इतका' दर लावला
5
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
6
संपादकीय : सरकारच्या प्रतिमेचे काय? डागाळलेली प्रतिमा अन् सत्तेची अपरिहार्यता
7
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
8
"छापा नाही, केवळ रुटीन व्हेरिफिकेशन...", शिल्पा शेट्टीच्या वकिलांनी छापेमारीचं वृत्त फेटाळलं
9
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
10
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
11
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
12
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
13
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
14
पक्षश्रेष्ठींच्या आदेशामुळे १८ मंडल, प्रांत अध्यक्ष नाराज; शिंदेसेनेसोबत युती नको, स्वबळावर लढू द्या
15
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
16
ऐन निवडणुकीच्या तोंडावर मराठी शाळा मुद्दा ऐरणीवर, मराठी अभ्यास केंद्राचा मोर्चा; निवडणुकीनंतर चर्चा होणार
17
दगडातून इतिहास साकारणारे शिल्पकार राम सुतार कालवश; वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
18
खासगी विमान व्यवसाय महाराष्ट्रातून जाणार? पार्किंग, विमान उतरण्यासाठीचे स्लॉट मिळणे कठीण होत असल्याची भावना
19
१५ हजार एचआयव्ही रुग्णांनी अर्धवट सोडले उपचार; सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर इशारा
20
विजयासाठी पैठणी, नथींचे देताहेत वाण : लकी ड्रॉमध्ये टीव्ही, फ्रिज अन् एसी सुद्धा...
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: लस आल्यानंतरही कोरोनाचा मुक्काम कायम राहणार; तज्ज्ञांच्या दाव्यानं चिंतेत वाढ

By कुणाल गवाणकर | Updated: October 20, 2020 07:59 IST

CoronaVirus Vaccine News: कोरोनावरील लस उपलब्ध झाली तरीही कोरोना संपणार नाही; ब्रिटनचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार सर पॅट्रिक वॉलेस यांचा दावा

लंडन: जगातील कोरोना रुग्णांची संख्या ४ कोटींच्या पुढे गेली आहे. तर मृतांचा आकडा ११ लाखांहून अधिक आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता संपूर्ण जग कोरोनावरील लसीची वाट पाहत आहे. सध्या जगभरात जवळपास १५० लसींवर काम सुरू आहे. कोरोना लस उपलब्ध झाल्यावर कोरोना संकटावर मात करता येईल, अशी आशा सगळ्यांना आहे. मात्र कोरोना लस उपलब्ध झाली तरीही कोरोनाला रोखता येणार नाही, असा दावा ब्रिटनचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार सर पॅट्रिक वॉलेस यांनी केला आहे."कोरोना नियंत्रणात येणार, फेब्रुवारीपर्यंत केवळ ४० हजार अ‍ॅक्टिव्ह रुग्ण उरणार"कोरोनावरील लस मार्चच्या आधी उपलब्ध होणार नाही, असा अंदाज वॉलेस यांनी वर्तवला. 'कोरोना कधीही पूर्णपणे नष्ट होणार नाही. कोरोनावरील उपचार हंगामी तापासारखे असतील. अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे लसींसाठी होणाऱ्या संशोधनाचा दर्जा खूप सुधारला आहे. मात्र कोरोना लस सर्वांपर्यंत पोहोचणं अतिशय कठीण आहे,' अशी माहिती वॉलेस यांनी संसदीय समितीला दिली. कोरोनावरील लस उपलब्ध झाली तरीही कोरोनाचा प्रादुर्भाव रोखला जाईल, याची शक्यता अत्यंत कमी असल्याचं वॉलेस म्हणाले.'या' १० कारणांमुळे थंडीच्या दिवसात वाढू शकतो कोरोनाचा धोका, जाणून घ्या तज्ज्ञांचे मतकोरोनाचा प्रादुर्भाव वाढत राहील, याची शक्यता जास्त आहे. काही काही भागांमध्ये तर कोरोना अतिशय सामान्य होऊन जाईल. मात्र लस टोचली गेल्यानंतर कोरोनाची लागण होण्याची शक्यता मावळेल. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव आणि त्याची तीव्रता कमी होईल. त्यानंतर कोरोना हा तापासारखा असेल, असं मत वॉलेस यांनी नोंदवलं. एखादी लस कोरोनापासून संरक्षण देते का आणि देत असल्यास किती काळ, या प्रश्नांची उत्तरं लवकरच मिळतील, असं ते पुढे म्हणाले.कोरोना संसर्गामुळे शरीरावर होत आहेत 'असे' परिणाम; तज्ज्ञांनी केला खुलासा, जाणून घ्या उपायसध्या अंतिम टप्प्यात असलेल्या बऱ्याच लसींनी शरीरात रोगप्रतिकारशक्ती तयार केली आहे. मात्र या लसी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखतात का, हे तिसऱ्या टप्प्यातल्या अंतिम चाचण्यांनंतरच समजेल. यातूनच कोरोना लस किती सुरक्षित आहे, हेदेखील कळेल. मोठ्या लोकसंख्येला कोरोना लस कशी दिली जाणार, हा प्रश्नही महत्त्वाचा आहे. पण पुढील मार्चपर्यंत कोरोना लस उपलब्ध होण्याची शक्यता अत्यंत कमी असल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या