शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वयाच्या ५७ व्या वर्षी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन सातव्यांदा बनले 'बाबा'; घरी झालं चिमुकलीचं आगमन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2021 14:13 IST

ब्रिटनचे पंतप्रधान (British Prime Minister) बोरिस जॉन्सन (Boris Johnson) वयाच्या ५७ व्या वर्षी सातव्यांदा वडील झाले आहेत. त्याची पत्नी ...

ब्रिटनचे पंतप्रधान (British Prime Minister) बोरिस जॉन्सन (Boris Johnson) वयाच्या ५७ व्या वर्षी सातव्यांदा वडील झाले आहेत. त्याची पत्नी कॅरी जॉन्सनने (Carrie Johnson) गुरुवारी एका गोंडस मुलीला जन्म दिला. आई आणि बाळ दोघांचीही प्रकृती उत्तम आहे. 'ब्रिटनच्या पंतप्रधानांच्या पत्नीने गुरुवारी सकाळी लंडनच्या रुग्णालयात एका बाळाला जन्म दिला. दोघांनीही काळजी आणि सहकार्यासाठी राष्ट्रीय आरोग्य सेवेच्या टीमचे आभार मानले आहेत,' असं ब्रिटनच्या पंतप्रधानांच्या प्रवक्त्यांनी सांगितलं.

या वर्षाच्या सुरुवातीला कॅरी जॉन्सन यांचा गर्भपात झाला होता. जुलैमध्ये एका इन्स्टाग्राम (Instagram Post) पोस्टद्वारे त्यांनी ही माहिती दिली होती. वर्षाच्या सुरुवातीला माझा गर्भपात झाला होता, त्यामुळे मी देखील दु:खी होते. पण आता पुन्हा गर्भवती राहिल्याने मला आनंद होत आहे," असंही त्यांनी लिहिलं होतं.बोरिस जॉन्सन यांनी या वर्षी मे महिन्यात वेस्टमिंस्टर कॅथेड्रल येथे कॅरी जॉन्सन यांच्याशी विवाह केला होता. यापूर्वी त्यांनी कॅरी सायमंड्स यांच्याशी विवाह केला होता. आता बोरिस जॉन्सन यांचं हे तिसरं लग्न आहे. बोरिस जॉन्सन आणि त्यांच्या पूर्वाश्रमीची पत्नी मरिना व्हिलर यांना घटस्फोट दिल्यानंतर त्यांचं हे तिसरं लग्न आहे. मरिना आणि बोरिस जॉन्सन यांना चार मुलं आहेत. बोरिस जॉन्सन आणि त्यांच्या आर्ट कन्सल्टन्ट हेलेन मॅकिनटायर यांच्याशीदेखील अफेयर होत. त्यांना २००९ मध्ये एक अपत्य झालं.

टॅग्स :Boris Johnsonबोरिस जॉन्सनEnglandइंग्लंड