शहरं
Join us  
Trending Stories
1
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
2
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
3
"आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान मॅच पाहतील"; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
4
'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग
5
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
6
वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...
7
पत्नीला ५ गोळ्या घातल्या, क्राइम सीनवरून फेसबुक लाईव्ह केलं; पती म्हणाला, "हिचे बॉयफ्रेंड पळून गेले..." 
8
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
9
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
10
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात जन्मलेल्या बाळांचे भविष्य कसे असते? शुभ की? ज्योतिष शास्त्राने केला उलगडा!
11
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?
12
उमेश सहकलाकार नसता तर मी हा सिनेमा केला नसता, प्रिया बापटने सांगितलं कारण
13
२, ३, ४BHK घर बांधायचेय? जीएसटीचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या
14
गर्लफ्रेंडने ब्लॉक केलं, प्रेमभंग जीवावर बेतला, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; उपचारादरम्यान मृत्यू
15
१०% नं घसरलाय हा शेअर, पण अजूनही IPO च्या किंमतीपेक्षा ६०% नं अधिक; काय म्हणाले एक्सपर्ट?
16
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
17
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
18
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
19
अंकिता लोखंडेचा नवरा रुग्णालयात दाखल; हाताला ४५ टाके अन्... मित्राने शेअर केली पोस्ट
20
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल

'नागा कवटीचा' लाखोंमध्ये होणारा लिलाव रद्द; भारताच्या विरोधानंतर ब्रिटनने उचलले पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2024 21:29 IST

या कवटीच्या लिलावाविरोधात भारतातून तीव्र विरोध झाला.

Auction News : ब्रिटेनमध्ये 19व्या शतकातील भारतील 'नागा कवटी'चा होणारा लिलाव थांबवण्यात आला आहे. एका ब्रिटिश ऑक्शन हाऊसने येत्या 9 ऑक्टोबर रोजी हा लिलाव आयोजित केला होता. पण, भारतातून त्याला प्रचंड विरोध झाल्यामुळे हा लिलाव रद्द करण्यात आला आहे. या लिलावाबाबत नागालँडचे मुख्यमंत्री नेफियु रिओ यांनी भारत सरकारला पत्र लिहून लिलाव थांबवण्याची मागणी केली होती. नागा समाजाच्या पूर्वजांच्या अवशेषांचा लिलाव करणे म्हणजे वसाहतवादी हिंसाचार असल्याचे त्यांचे म्हणने आहे.

नागालँडच्या मुख्यमंत्र्यांचे पत्रऑक्सफर्डशायर येथील स्वान ऑक्शन हाऊस नागा कवटीचा ऑनलाइन लिलाव करणार होते. या कवटीसोबतच जगभरातून गोळा केलेल्या अनेक कवट्या आणि इतर अवशेषांचा लिलावदेखील होणार होता. या लिलावात भारतील नागा जमातीची शिंगे असलेली मानवी कवटीदेखील ठेवण्यात आली होती. पण, नागालँडमध्ये या लिलावावरुन निदर्शने झाली. मुख्यमंत्री नेफियु रिओ यांनी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांना पत्र लिहून हा लिलाव थांबवण्याची मागणी केली.

नागालँडच्या मुख्यमंत्र्यांनी परराष्ट्र मंत्र्यांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात म्हटले की, 'ब्रिटनमधील नागा जमातीच्या अवशेषांच्या लिलावाचे वृत्त समजताच राज्यातील सर्व समुदायांनी आक्षेप घेतला आहे. हा आमच्या लोकांसाठी अतिशय भावनिक आणि पवित्र मुद्दा आहे. मृतांच्या अवशेषांना आदर आणि सन्मान देण्याची आपली परंपरा आहे. कवटीचा लिलाव थांबवण्यासाठी  त्यांनी परराष्ट्रमंत्र्यांना हे प्रकरण लंडनमधील भारतीय उच्चायुक्तांकडे मांडण्याची विनंती केली. 

दरम्यान, फोरम फॉर नागा रिकॉन्सिलिएशन (FNR) ने देखील या प्रकरणावर चिंता व्यक्त केली. FNR ने असा दावा केला की, मानवी अवशेषांचा लिलाव संयुक्त राष्ट्रांच्या कलम 15 चे उल्लंघन करते. FNR ने विक्रीचा निषेध करण्यासाठी थेट ऑक्शन हाउसशी संपर्क साधला आणि ती मानवी कवटी नागालँडला परत पाठवण्याचे आवाहन केले.

नागा कवटी किती मौल्यवान?ऑक्शन हाउसने आपल्या लिलावाच्या वर्णनात म्हटले आहे की, हॉर्नेड नागा ह्युमन स्कलसाठी सुरुवातीची बोली 2,100 पौंड (सुमारे 23 लाख रुपये) ठेवण्यात आली आहे. तर, यासाठी कमाल कमाल 4,000 पौंड (सुमारे 43 लाख) बोली लागण्याचा अंदाज ऑक्शन हाउसने व्यक्त केला होता.

टॅग्स :LondonलंडनInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्सInternationalआंतरराष्ट्रीयnagaland-pcनागालँड