शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
4
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
5
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
6
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
7
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
8
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
9
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
10
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
11
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
12
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
13
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
14
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
15
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
16
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
17
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
18
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
19
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
20
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

पीएम मोदी, पुतिन आणि शी जिनपिंग यांचा हसतानाचा फटो होतोय व्हायरल, अमेरिकेचं टेन्शन वाढणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2024 13:02 IST

या फोटोमध्ये पीएम मोदी, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन जवळ जवळ बसलेले असून हसताना दिसत आहेत.

रशियातील कझान येथे सुरू असलेल्या 16व्या ब्रिक्स परिषदेकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. यातच एक फोटो सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. जो अमेरिकेचे टेन्शन वाढवणारा आहे. या फोटोमध्ये पीएम मोदी, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन जवळ जवळ बसलेले असून हसताना दिसत आहेत.

जगातील बलाढ्य देशांपैकी असलेले भारत, रशिया आणि चीनच्या सर्वोच्च नेत्यांचा हा हसतानाचा फटो अमेरिकेचे टेन्शन वाढवत असेल. खरे तर, BRICS हा पाच उदयोन्मुख अर्थव्यवस्थांचा एक आंतरराष्ट्रीय गट आहे. यात ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका यांचा समावेश आहे. मात्र, यावेळी इराण, इजिप्त, इथिओपिया आणि संयुक्त अरब अमिराती हे चार नवे देशही यात सहभागी झाले आहेत. महत्वाचे म्हणजे, ब्रिक्स गटातील देश हा अमेरिकेसाठी नेहमीच चिंतेचा विषय राहिला आहे.

ब्रिक्समध्ये पंतप्रधान मोदी यांचे ग्रँड वेलकम -ब्रिक्स परिषदेसाठी पोहोचलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ग्रँड वेलकम करण्यात आले. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी त्यांचे जबरदस्त स्वागत केले. त्यांनी पंतप्रधान मोदी यांची गळाभेट घेतली. यापूर्वी एअरपोर्टवर रशियातील राज्‍य तरारास्‍तानच्या प्रमुखांनी पंतप्रधान मोदींचे स्वागत केले. यानंतर, पुतिन आणि पंतप्रधान मोदी यांच्यात द्विपक्षीय चर्चा झाली. यावेळी पंतप्रदान मोदींनी म्हणाले की, त्यांचे गेल्या 3 महिन्यांत दोन वेळा रशिया दौऱ्यावर येणे हे दोन्ही देशातील मित्रत्वाच्या संबंधांचे प्रमाण आहे.

आजच शी जिनपिंग यांना भेटणार मोदी -आज पाच वर्षांनंतर पंतप्रधान मोदी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना भेटणार आहेत. दोन्ही देशांदरम्यानचा सीमा वाद सोडविण्यासंदर्भात करण्यात आलेल्या घोषणेनंतर, ही पहिलीच भेट आहे. या भेटीपूर्वीच व्हायरल झालेला फोटो बरंच काही सांगून जातो, या फोटोत पुतिन हे पीएम मोदी आणि जिनपिंग यांना जोडणाऱ्या पुलाप्रमाणे दिसत आहेत. 

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीVladimir Putinव्लादिमीर पुतिनrussiaरशियाchinaचीनXi Jinpingशी जिनपिंग