शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

जगातील पहिला पुरुष : नवजात कन्येला पित्याने दिले स्तनपान!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2018 05:56 IST

प्रसूतीच्या वेळी कराव्या लागलेल्या ‘सिझेरियन’ शस्त्रक्रियेत गुंतागुंत निर्माण झाल्याने नवजात कन्येला पत्नी अंगावर पाजू शकत नाही अशी स्थिती आल्याने त्या कन्येला स्वत: स्तनपान देणाऱ्या मॅक्समिलन न्यूबॉयर या पित्याचे समाजमाध्यमांत कौतुक होत आहे.

वॉशिंग्टन : प्रसूतीच्या वेळी कराव्या लागलेल्या ‘सिझेरियन’ शस्त्रक्रियेत गुंतागुंत निर्माण झाल्याने नवजात कन्येला पत्नी अंगावर पाजू शकत नाही अशी स्थिती आल्याने त्या कन्येला स्वत: स्तनपान देणाऱ्या मॅक्समिलन न्यूबॉयर या पित्याचे समाजमाध्यमांत कौतुक होत आहे.नवजात अर्भकाला आईने स्तनपान देण्याचे वैद्यकीय व भावनिक महत्त्व विस्कॉन्सिन राज्यातीलन्यूबॉयर दाम्पत्यास डॉक्टर व परिसेविकांनी पटवून दिले होते. मॅक्समिलनची पत्नी एप्रिल त्या अनुभवाची प्रतीक्षाही करीत होती. परंतु प्राप्त परिस्थितीत ते शक्य होणार नाही हे नक्की झाल्यावर न्यूबॉयर दाम्पत्य खट्टू झाले.सिबिल मार्टिन डेन्हे या परिसेविकेने त्यांना धीर दिला. मातेच्या अडचणीमुळे नवजात बालिकेस पहिल्या स्तनपानापासून वंचित ठेवण्याची गरज नाही, असे सांगून सिबिलने पिताही स्तनपान देऊ शकेल, असा पर्याय सुचविला. परिचर्या अभ्यासक्रमात ‘सप्लिमेंटल नर्सिंग मेथड’ म्हटले जाते, अशा पद्धतीने स्तनपान देण्याची व्यवस्थाही तिने उपलब्ध केली.आनंदित मॅक्समिलनने हा पर्याय मान्य करून कन्येला पहिले स्तनपान दिले. परिसेविका सिबिल हिने त्या क्षणांचे व्हिडीओ चित्रीकरण केले. नवजात अपत्यास स्तनपान देणारा जगातील पहिला पिता ठरल्याबद्दल आनंद व्यक्त करणाºया मॅक्समिलनच्या संदेशासह हा व्हिडीओ फेसबुकवर पोस्ट केलागेला. अपत्यजन्माच्या वेळी पालकत्वाची अशीही जबाबदारी पार पाडणाºया मॅक्समिलनचे कौतुक केले गेले. (वृत्तसंस्था)कसे केले स्तनपान?अशा पद्धतीने स्तनपान करण्यासाठी ‘सक्शन पंप’चा वापर केला जातो. पंपाला नळी असते व बाळाला चोखून दूध पिता यावे यासाठी नळीच्या टोकाला ‘निपल’ बसविलेले असते.मातेचे पहिले चिकासारखे घट्ट दूध या पंपाच्या नळीतून पुढे ढकलले जाते. या क्रियेत मुलाला दूध पाजण्याइतकेच पाजणाºया व्यक्तीच्या त्वचेचा स्पर्श होऊन उब मिळणेही महत्त्वाचे असते.मॅक्समिलनने आपण बाळाला अंगावरच पाजतो आहोत, असे छातीशी धरून पर्यायी पद्धतीने स्तनपान दिले.मातांसाठीकेलेली सोयज्या मातांना अंगावर कमी दूध येते त्यांच्यासाठी, दुग्धग्रंथींचे स्रवण वाढविण्यासाठी व ज्या मुलांना दूध ओढण्यात अडचण येते त्यांचे स्तनपान सुलभ करण्यासाठी या पर्यायी व पूरक स्तनपानाचे तंत्र विकसित करण्यात आले आहे. मात्र पुरुषाने स्तनपान देण्यासाठी त्याचा प्रथमच वापर झाला.

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीय