शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या टॅरिफला अमेरिकेतच विरोध; भारतावरील ५०% टॅरिफ रद्द करण्याचा प्रस्ताव
2
कोलकात्यात मेस्सी आला अन्... संतप्त चाहत्यांनी खुर्च्यांचाच फुटबॉल केला!
3
इसिसच्या मॉड्युलची पडघ्यात खैराच्या लाकडाची मोठी तस्करी; ईडीने केलेल्या तपासातून माहिती आली उजेडात
4
'मतचोरी'त भाजपच्या माजी आमदारासह मुलाचा सहभाग; आळंद येथील घटनेप्रकरणी सात जणांवर आरोपपत्र
5
इंडिगोचे पंख आवळले, ५९ कोटींचा ठोठावला दंड! आदेशाला आव्हान देण्याचा विमान कंपनीचा विचार
6
संसदेवरील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण; २००१ मध्ये झाला होता हल्ला
7
ज्येष्ठांच्या संरक्षणाबाबत पोलिसांचे वर्तन बेफिकीर; वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून मारहाणप्रकरणी हायकोर्टाचे पोलिसांवर ताशेरे
8
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
9
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
10
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
11
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
12
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
13
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
14
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
15
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
16
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
17
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
18
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
19
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
20
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
Daily Top 2Weekly Top 5

Helicopter Crash: विजेच्या तारांचा स्पर्श होताच हेलिकॉप्टर क्रॅश, समोर आला अंगावर शहारा आणणारा VIDEO

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2022 14:36 IST

विजेच्या तारांचा स्पर्श होताच हेलिकॉप्टर कोसळलं...; VIDEO पाहून तुमचाही थरकाप उडेल...!

विमान अथवा हेलिकॉप्टर क्रॅश झाल्याच्या बातम्या नेहमीच समोर येत असतात. मात्र, हेलिकॉप्टर अपघाताचा एक व्हिडिओ नुकताच ब्राझीलमधून समोर आला आहे. हे हेलिकॉप्टर अचानकपणे विजेच्या तारांना अडकले आणि क्रॅश झाले या हेलिकॉप्टरमध्ये बडे सेलिब्रिटी उपस्थित असल्याचे समजते.

चुकून विजेच्या तारांना धडकले हेलिकॉप्टर - ही घटना ब्राझीलमधील एका शहरात घडली. 'द मिरर'च्या  एका वृत्तानुसार, एका फुटबॉल ग्राउंडवर लँड होण्यापूर्वी हे हेलिकॉप्टर चुकून विजेच्या तारेला धडकले. हेलिकॉप्टरचा विजेच्या तारांना स्पर्श होताच एकदमच वीज तडकल्याचा आवाज आला. यानंतर हेलिकॉप्टर पुढे जाऊ शकले नाही आणि क्रॅश झाले.

खासदार आणि उपमहापौरांसह चार जण होते स्वार - हेलिकॉप्टर क्रॅश होताच घटनास्थळी तत्काळ बचावकार्य सुरू झाले. सुदैवाची गोष्ट म्हणजे, हे हेलिकॉप्टर विजेच्या तारांचा स्पर्श होताच क्रॅश झाले आणि ते अधिक उंचीवरही नव्हते. या हेलिकॉप्टरमध्ये एका खासदारासह चार जण बसलेले होते आणि सर्वांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे. खबरदारी म्हणून, या सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यांपैकी एकाला किरकोळ दुखापत झाली आहे.

विजेच्या तारांचा स्पर्श होताच हेलिकॉप्टरला आग लागली. यामुळे ते पायलटच्या नियंत्रणाबाहेर गेले आणि क्रॅश झाले. या घटनेचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यात हेलिकॉप्टर खाली कोसळताना दिसत आहे. हेलिकॉप्टर खाली कोसळताच घटनास्थळी एकच धावपळ उडाली होती.

टॅग्स :Brazilब्राझीलHelicopter Crashहेलिकॉप्टर दुर्घटनाSocial Viralसोशल व्हायरल