शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

ब्रिटनचे माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी मुलाखत देण्यासाठी मागितले 8 कोटी, अमेरिकन पत्रकाराचा धक्कादायक दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2024 16:19 IST

Tucker Carlson : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या मुलाखतीनंतर टकर कार्लसन यांनी हा दावा केला आहे.

ब्रिटनचे माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्याबाबत अमेरिकन पत्रकार टकर कार्लसन यांनी मोठा दावा केला आहे. बोरिस जॉन्सन यांनी मुलाखत देण्यासाठी जवळपास 8 कोटी रुपये मागितल्याचे टकर कार्लसन यांनी म्हटले आहे. दरम्यान, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या मुलाखतीनंतर टकर कार्लसन यांनी हा दावा केला आहे. गेल्या मंगळवारी ब्लेझ टीव्हीचे संस्थापक ग्लेन बेक यांच्याशी संवाद साधताना अमेरिकन पत्रकार टकर कार्लसन यांनी राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या मुलाखतीच्या अनुभवाबद्दल सांगितले. यावेळी टकर कार्लसन यांनी बोरिस जॉन्सन यांच्याबाबत दावा केला. 

ब्रिटनचे माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी टकर कार्लसन यांना क्रेमलिनचे साधन म्हटले होते. तसेच, ते सतत टकर कार्लसन यांच्यावर टीका करत होते, त्यामुळे टकर कार्लसन यांनी बोरिस जॉन्सन यांची मुलाखत घ्यायची होती. यासाठी त्यांनी बोरिस जॉन्सन यांना विनंतीही केली होती. टकर कार्लसन म्हणाले की, बोरिस जॉन्सन यांचा सल्लागार आपल्याकडे आला आणि म्हणाला की बोरिस जॉन्सन एक मुलाखत देतील, पण त्यासाठी तुम्हाला खूप किंमत मोजावी लागेल, त्यांची एक अट आहे. 

बोरिस जॉन्सन यांच्या मुलाखतीसाठी दहा लाख डॉलर्स खर्च येईल. बोरिस जॉन्सन मुलाखतीसाठी फी मागत आहेत, ती दिली तरच ते मान्य होतील, असे टकर कार्लसन यांनी ग्लेन बेक यांना सांगितले. तसेच, बोरिस जॉन्सन यांना अमेरिकन डॉलर्स, सोने किंवा बिटकॉइन हवे आहेत, असेही सल्लागाराने सांगितल्याचे टकर कार्लसन म्हणाले. नुकतीच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची मुलाखत घेतली होती, पण त्यांनी दहा लाख डॉलर्स मागितले नाहीत, असेही टकर कार्लसन यांनी सांगितले.

व्लादिमीर पुतीन यांच्या मुलाखतीवर टीका अमेरिकन पत्रकार टकर कार्लसन यांनी घेतलेल्या व्लादिमीर पुतिन यांच्या मुलाखतीवर बोरिस जॉन्सन यांनी जोरदार टीका केली आहे. डेली मेलसाठी लिहिलेल्या लेखात बोरिस जॉन्सन यांनी टकर कार्लसन यांना हुकूमशहा आणि पत्रकारितेचे देशद्रोही म्हटले आहे. युक्रेनमध्ये रशियाच्या लष्करी कारवाईबाबत व्लादिमीर पुतिन यांच्यावर दबाव आणण्यात टकर कार्लसन अपयशी ठरल्याचेही बोरिस जॉन्सन यांनी म्हटले आहे. दरम्यान, टकर कार्लसन यांच्या व्लादिमीर पुतिन यांच्या मुलाखतीवर केवळ बोरिस जॉन्सनच नव्हे तर अनेक पाश्चिमात्य नेत्यांनीही टीका केली आहे. या नेत्यांचा आरोप आहे की टकर कार्लसन यांनी व्लादिमीर पुतिन यांना सोपे प्रश्न विचारले आणि त्यांचे मत व्यक्त करण्यासाठी त्यांना बराच वेळ दिला.

टॅग्स :Boris Johnsonबोरिस जॉन्सनVladimir Putinव्लादिमीर पुतिनInternationalआंतरराष्ट्रीयinterviewमुलाखत