शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

बोरिस जॉन्सननी खासदारकीचाही राजीनामा दिला; कोरोना काळातल्या पार्ट्या नडल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2023 08:19 IST

पंतप्रधानपदावर असताना लॉकडाऊन नियमांचे उल्लंघन करून पार्टी केल्याबद्दल, संसदेची दिशाभूल केल्याबद्दल त्यांच्यावर बंदी घालण्याची शिफारस संसद समितीने केली आहे.

ब्रिटनचे माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्यावरील शुक्लकाष्ठ काही संपण्याचे नाव घेत नाहीय. आधीच पंतप्रधानपद सोडावे लागलेले असताना आता पार्टीगेट प्रकरणामुळे संसदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा देखील द्यावा लागला आहे. त्यांच्या या निर्णयाने सर्वांनाच धक्का बसला आहे. 

पंतप्रधानपदावर असताना लॉकडाऊन नियमांचे उल्लंघन करून पार्टी केल्याबद्दल, संसदेची दिशाभूल केल्याबद्दल त्यांच्यावर बंदी घालण्याची शिफारस संसद समितीने केली आहे. 58 वर्षीय जॉन्सन यांनी लॉकडाऊन नियमांचे उल्लंघन करून कोविड साथीच्या काळात डाऊनिंग स्ट्रीटमध्ये पार्टी केली होती. यावेळी संसदेची त्यांनी दिशाभूल केली होती, असा आरोप होता. विशेषाधिकार समितीकडून या प्रकरणावर गोपनीय पत्र मिळाल्यानंतर जॉन्सन यांनी शुक्रवारी राजीनामा जाहीर केला.

आपली संसदेतून हकालपट्टी करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप जॉन्सन यांनी केला आहे. समितीने आतापर्यंत मी जाणूनबुजून किंवा बेपर्वाईने संसदेची दिशाभूल केल्याचा एकही पुरावा सादर केलेला नाही, असे ते म्हणाले. लॉकडाऊन दरम्यान डाऊनिंग स्ट्रीटमध्ये आयोजित पार्ट्यांमध्ये लॉकडाऊन नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप योग्य नाहीय. ते अत्यावश्यक कार्यक्रम होते, त्यामुळे त्याला परवानगी देण्यात आली. या वेळी आवश्यक त्या सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यात आले होते, असेही ते म्हणाले. या वर्षी मार्चमध्ये विशेषाधिकार समितीला दिलेल्या जबाबामध्ये जॉन्सन यांनी संसदेची दिशाभूल केल्याचे मान्य केले होते. मात्र, त्यांनी हे जाणूनबुजून केल्याचा इन्कार केला होता. 

टॅग्स :Boris Johnsonबोरिस जॉन्सन