शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

रशियाच्या ताब्यातील बाजारपेठेत बॉम्बस्फोट, २७ जणांचा मृत्यू; युक्रेनच्या सैन्यावर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2024 10:21 IST

युक्रेनियन सैन्याने मात्र आरोप फेटाळले

Russia Ukraine War, bombing: रशियाच्या ताब्यातील युक्रेनच्या बाजारपेठेत झालेल्या बॉम्बस्फोटात २७ जणांचा मृत्यू झाला आहे. स्थानिक अधिकाऱ्यांनी रविवारी ही माहिती दिली. डोनेस्तक शहराच्या उपनगरातील टेकस्टिलश्चिकमध्ये रविवारी सकाळी हा हल्ला करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. डोनेस्तक येथे रशियाने नियुक्त केलेले सर्वोच्च अधिकारी डेनिस पुशिलिन यांनी सांगितले की, या हल्ल्यात २५ जण जखमी झाले आहेत. युक्रेनच्या लष्कराने हा बॉम्बहल्ला केल्याचे त्यांनी सांगितले. पण या भागात उपस्थित असलेल्या युक्रेनच्या लष्करी गटाने हल्ल्याचा इन्कार केला आहे.

पुशिलिन म्हणाले की, आपत्कालीन सेवेचे कर्मचारी घटनास्थळी बचाव कार्य करत आहेत. दरम्यान, स्थानिक अधिकार्‍यांनी सांगितले की, रविवारी रशियाच्या उस्ट-लुगा बंदरातील रासायनिक वाहतूक टर्मिनलमध्ये दोन स्फोट झाल्यानंतर आग लागली. स्थानिक मीडियाने सांगितले की बंदरावर युक्रेनियन ड्रोनने हल्ला केला, ज्यामुळे गॅस टाकीचा स्फोट झाला आणि आग लागली. रशियन स्थित किंगसेप प्रदेशातील बंदराचे प्रमुख युरी झाप्लात्स्की यांनी एका निवेदनात सांगितले की, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, परंतु जिल्ह्याला 'हाय अलर्ट' वर ठेवण्यात आले आहे.

हल्ल्यानंतर काढण्यात आलेल्या छायाचित्रांमध्ये दुकानाचे मोठे नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. दुकानाच्या समोरील रस्त्यावर मृतदेह पडल्याचे दिसून आले. एपीएफच्या अहवालानुसार, एका स्थानिक रहिवाशाने स्थानिक मीडियाला सांगितले की, त्याला रॉकेट डोक्यावरून जात असल्याचा आवाज आला. यानंतर ती मार्केटमधील स्टॉलखाली तो लपला. त्यानंतर मोठा स्फोट झाला आणि धूर दिसू लागला.

युक्रेनियन सैन्याने दिला नकार

फेसबुकवर पोस्ट केलेल्या निवेदनात, युक्रेनियन सैन्याच्या तावरिया युनिटने सांगितले की त्यांचे सैन्य या ऑपरेशनमध्ये सामील नव्हते. त्यांनी पुढे लिहिले, 'डोनेस्तक हे युक्रेनमध्येच आहे! युक्रेनियन लोकांचा जीव गेला आहे त्यामुळे यासाठी रशियाला जबाबदार धरले पाहिजे. रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाने रशियाच्या शांतताप्रिय लोकांविरुद्ध युक्रेनच्या सैन्याने केलेले कृत्य दहशतवादी असल्याचे म्हटले आहे. रशियाने सांगितले आहे की, हल्ल्यात अशी शस्त्रे वापरली गेली, जी पाश्चात्य देशांनी युक्रेनला दिली होती.

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशियाrussiaरशियाBombsस्फोटके