शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

आर्थिक चणचण, पॅरिसमध्ये ‘मर्डर गर्ल’ मल्लिका शेरावत रस्त्यावर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2018 18:40 IST

बॉलिवूडची हॉटेस्ट गर्ल, अभिनेत्री मल्लिका शेरावत आर्थिक चणचणीमुळे रस्त्यावर आली आहे. भाडे थकविल्यामुळे फ्रेंच कोर्टाने मल्लिकाला पॅरिस येथील घर खाली करण्याचे आदेश दिले आहेत.

पॅरीस - बॉलिवूडची हॉटेस्ट गर्ल, अभिनेत्री मल्लिका शेरावत आर्थिक चणचणीमुळे रस्त्यावर आली आहे. भाडे थकविल्यामुळे फ्रेंच कोर्टाने मल्लिकाला पॅरिस येथील घर खाली करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे मल्लिकाला आता नवे घर शोधावे लागणार आहे. मल्लिका आणि तिचा फ्रेंच बॉयफ्रेन्ड साइरिल ऑक्जेनफेन्स या दोघांना घर भाडे न दिल्याने पॅरिसमध्ये बेघर व्हावे लागले आहे. मल्लिका तिचा बॉयफ्रेंड सायरिल ऑक्सनफँससोबत पॅरिसच्या १६, एरांडिस्मेंट अपार्टमेंटमध्ये राहते. या भागात ‘थंडरबाल’ व ‘लास्ट टेंगो’ या सारख्या चित्रपटांचे शूटींग झाले आहे. मल्लिका दीर्घकाळापासून साइरिलसोबत राहत आहेत. या दोघांनीही सीक्रेट मॅरेज केल्याची चर्चा मध्यंतरी होती.  अर्थात मल्लिकाने या सगळ्या चर्चा अफवा असल्याचे सांगत अफवा पसरवणे बंद करा, असे म्हटले होते. ज्यादिवशी मी लग्न करेल, त्यादिवशी मी सर्वांना निमंत्रित करेल, असेही तिने स्पष्ट केले होते.

तिच्यावर घराच्या भाड्यापोटीचे 64 लाख रुपये थकविल्याचा आरोप आहे. हे दोघंही जानेवारी 2017 पासून येथे राहतात. भाडे थकविल्यामुळे घरमालकाने कोर्टात धाव घेऊन मल्लिकाला घरातून बाहेर काढण्याची मागणी केली होती. 'मल्लिकाने कधीच वेळेवर भाडे दिले नाही. घराचं भाडं महिन्याला 4 लाख 60 हजार 946 रुपये असताना तिने आतापर्यंत केवळ 2 लाख 6 हजार717 रुपयेच भरले आहेत,  असा दावा घरमालकाने केला होता. याप्रकरणी कोर्टाने 14 डिसेंबर रोजी मल्लिकाला नोटीसही पाठवली होती. त्यात दोघांना थकविलेले भाडे भरण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र या दोघांनी या नोटीशीला काहीच उत्तर दिलं नव्हतं. त्यामुळे कोर्टाने अखेर त्यांना घर खाली करण्याचे आदेश दिले. मल्लिका शेरावत दीर्घकाळापासून बॉलिवूडमधून गायब आहे. 2015 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘डर्टी पॉलिटीक्स’ या चित्रपटात ती अखेरची दिसली होती. यानंतर 2016 मध्ये ‘टाइम राइडर्स’ या चीनी चित्रपटात ती झळकली होती.  ‘मर्डर गर्ल’ नावाने प्रसिद्ध झालेली मल्लिका ‘मर्डर’,‘किस किस की किस्मत’, ‘प्यार के साईड इफेक्ट्स’,‘गुरू’,‘हिस्स’ अशा अनेक बॉलिवूड चित्रपटांत दिसलेली आहे. ‘द मिथ’ या विदेशी चित्रपटात जॅकी चॅनसोबत तिने काम केले आहे.

टॅग्स :Mallika Sherawatमल्लिका शेरावतCourtन्यायालय