शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: DC ची अडचण वाढली, रिषभ पंतवर एका सामन्याची बंदी अन् ३० लाखांचा दंड
2
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
3
लोकसभेच्या निकालानंतर संजय राऊत, उद्धव ठाकरे यांना अज्ञातवासात जावं लागेल, चंद्रशेखर बावनकुळेंचा टोला
4
"सत्तेचा गैरवापर करणे ही पंतप्रधान मोदींची खासियत"; शरद पवार यांचा शिरूरमधून हल्लाबोल
5
एक एक गोष्ट बदलत आहेत, हे मंदिर मी उभं केलंय...; Rohit Sharma चा व्हिडीओ KKRकडून डिलीट
6
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 
7
'भाजप पुन्हा जिंकला तर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील'; केजरीवालांचा गंभीर आरोप
8
Patel Engineering Ltd: वर्षभरात पैसे दुप्पट, ३ वर्षांपासून शेअर देतोय जबरदस्त रिटर्न; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
9
POK मध्ये युद्धजन्य परिस्थिती; पाकिस्तानच्या दादागिरीविरोधात काश्मिरी जनता रस्त्यावर
10
EPFO: तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर घरबसल्या कसा कराल अपडेट? पाहा प्रोसेस
11
'आता KKRला सोडून जाऊ नको' म्हणत चाहत्याला फुटलं रडू, प्रेम पाहून गौतम गंभीरही झाला नि:शब्द (video)
12
भारीच! 18 तास काम केल्यावर 1000 रुपये मिळायचे; आता फुलांच्या शेतीतून झाला करोडपती
13
Fact Check : "मी तुम्हाला बेरोजगार करेन..."; योगी आदित्यनाथ यांच्या Video मागचं जाणून घ्या, 'सत्य'
14
Paytm चे 'अच्छे दिन' परतले; २ दिवसांत १३%ची वाढ, काय म्हणतायत एक्सपर्ट, किती आहे टार्गेट प्राईज?
15
मसाल्यांमधील ETO केमिकल्सवर सरकार अंकुश लावण्याच्या तयारीत, निर्यातदारांना करावं लागणार 'हे' काम
16
रवींद्र धंगेकरांचा भाजपावर गंभीर आरोप, म्हणाले, ‘पुण्यात पैशांचे ट्रक आलेत, आज फडणवीस वाटप करतील’
17
प्रज्वल रेवण्णा प्रकरण उघडकीस आणणारा भाजपा नेता अडचणीत, पोलिसांनी केली अटक, समोर आलं असं कारण   
18
पुण्यातील सभेनंतर संजय राऊतांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल; "ते महाराष्ट्रद्रोही...."
19
"राहुल गांधी हे 'रणछोड दास'; जे स्वत: निवडणूक जिंकू शकत नाही, ते आपल्या पक्षाला..."
20
खळबळजनक ! नोटांनी भरलेला 'छोटा हाथी' वाहन पलटी; रस्त्यावर पडले तब्बल ७ कोटी

विमान अपघातातील पीडितांच्या कुटुंबीयांना बोईंग देणार 689 कोटींची नुकसान भरपाई 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2019 1:42 PM

गेल्या वर्षभरात झालेल्या बोईंग कंपनीच्या दोन 737 मॅक्स विमानांना झालेल्या अपघातांमुळे या विमानांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. दरम्यान...

न्यूयॉर्क -  गेल्या वर्षभरात झालेल्या बोईंग कंपनीच्या दोन 737 मॅक्स विमानांना झालेल्या अपघातांमुळे या विमानांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. दरम्यान, या विमानांची निर्मिती करणाऱ्या बोईंग कंपनीने या विमान अपघातातील पीडितांच्या कुटुंबीयांना आणि समुदायांना 10 कोटी डॉलर (सुमारे) 689 कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे.  दरम्यान, ही रक्कम पुढील वर्षांसाठी प्राथमिक स्वरूपाची असेल. त्याबरोबरच इथिओपियन एअललाइन्स आणि लायन एअरद्वारे चालवण्यात येणाऱ्या 737 मॅक्स विमानांना झालेल्या अपघातामुळे प्रभावित झालेल्या क्षेत्रातील लोकांच्या उदरनिर्वाहासाठी आणि आर्थिक उन्नतीसाठी स्थानिक सरकारे आणि अशासकीय संघटनांसोबत काम करण्यात येईल असेही बोईंग कंपनीने सांगितले.  या विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या कुटुंबीयांनी बोइंग कंपनीवर खटला दाखल केलेला आहे. गेल्यावर्षी 29 ऑक्टोबर रोजी लायन एअरच्या 610 बोईंग 737 विमानाला इंडोनेशियातील जकार्ता येथून उड्डाण केल्यानंतर 13 मिनिटांनंतर हे विमान अपघातग्रस्त झाले होते. यात 189 जणांचा मृत्यू झाला होता. तर यावर्षी 10 मार्च रोजी इथिओपियन एअरलाइन्सच्या विमानाला उड्डाण केल्यानंतर काही वेळातच अपघात झाला होता. यात 157 जणांचा मृत्यू झाला होता. सहा महिन्यांच्या कालावधीत झालेल्या दोन अपघातांमुळे बोइंग कंपनीच्या मॅक्स 737 या विमानांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते.   

टॅग्स :airplaneविमानInternationalआंतरराष्ट्रीय