फ्लोरिडा- फ्लोरिडामधील जॅक्सनविलेच्या सेंट जॉन नदीत शुक्रवारी बोइंग 737 प्रवासी विमान कोसळलं. नेव्हल एअर स्टेशन जेक्सनविलेच्या एका प्रवक्त्यानं सांगितलं की, विमान लँडिंग करत असताना ही दुर्घटना घडली आहे. विमान नदीत कोसळलं, त्यादरम्यान विमानातून 136 प्रवासी प्रवास करत होते. सुदैवानं या अपघातात कोणतीही जीवितहानी झाल्याचं वृत्त नाही. (सविस्तर वृत्त लवकरच)
बोइंग 737 विमान फ्लोरिडाच्या नदीत कोसळलं, 136 प्रवासी होते विमानात
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2019 09:06 IST