शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

"भारताच्या एअर स्ट्राइकनंतर 200 दहशतवाद्यांचे मृतदेह खैबर पख्तूनख्वाला हलवले"

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2019 13:56 IST

अमेरिकेत वास्तव्याला असलेले गिलगिटचे माहिती अधिकार कार्यकर्ते सेंगे हसनान सेरिंग यांनी बालाकोट एअर स्ट्राइकवर खळबळजनक खुलासा केला आहे.

वॉशिंग्टन- अमेरिकेत वास्तव्याला असलेले गिलगिटचे माहिती अधिकार कार्यकर्ते सेंगे हसनान सेरिंग यांनी बालाकोट एअर स्ट्राइकवर खळबळजनक खुलासा केला आहे. सेरिंग यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्या व्हिडीओमध्ये त्यांनी पाकिस्तानातील स्थानिक ऊर्दू वर्तमानपत्राचा हवाला देत भारताच्या एअर स्ट्राइकमध्ये पाकिस्तानच्या 200 दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याचं म्हटलं आहे. भारताच्या एअर स्ट्राइकनंतर 200 दहशतवाद्यांचे मृतदेह पाकिस्तानी सैनिकांनी बालाकोटहून खैबर पख्तूनख्वाला हलवल्याची माहिती सेरिंग यांनी दिली आहे.सेरिंग यांनी शेअर केलेल्या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये पाकिस्तानी सैन्य अधिकाऱ्यांनी 200हून अधिक दहशतवाद्यांना दफन केल्याचं कबूल केल्याचा दावा केला आहे. पाकिस्तानी सैन्य अधिकाऱ्यांनी त्या दहशतवाद्यांना शहीद संबोधलं आहे. तसेच पाकिस्तान सरकारच्या शत्रूंविरोधात हे लोक काम करत असल्याचंही काही सैनिक म्हणाले आहेत. व्हिडीओमध्ये काही पाक अधिकारी रडणाऱ्या मुलांना शांत करत असल्याचं पाहायला मिळतंय. हा व्हिडीओ वाऱ्यासारखा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.भारतानं एअर स्ट्राइकमध्ये बालाकोटमध्ये दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले होते. या एअर स्ट्राइकमध्ये अनेक दहशतवाद्यांचा खात्मा झाला होता. परंतु किती दहशतवादी मारले गेले यावरून काहीसा संभ्रम आहे. त्यातच आता 200 दहशतवादी ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. बालाकोटमधूनच पुलवामा हल्ल्यातील दहशतवाद्यांना ट्रेनिंग मिळाल्याचंही उघड झालं होतं. 

टॅग्स :Indian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकindian air forceभारतीय हवाई दलterroristदहशतवादी