शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

५० कोटी डॉलर्ससाठी घात; दुबईच्या वाळवंटात क्रिप्टो उद्योजकासह पत्नीची निर्घृण हत्या, पुरलेले मृतदेह सापडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 14:44 IST

रशियन क्रिप्टो उद्योजक रोमन नोवाक आणि पत्नीची निर्घृण हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

Russian Crypto Couple Found Dead:रशियातील वादग्रस्त क्रिप्टो उद्योजक रोमन नोवाक आणि त्यांची पत्नी अॅना नोवाक यांचे मृतदेह संयुक्त अरब अमिरातीमधील एका निर्जन वाळवंटी भागात सापडले आहेत. ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासून हे दोघे बेपत्ता होते. फसवणुकीचा आरोप सिद्ध झालेल्या या उद्योजकाच्या हत्येमुळे आंतरराष्ट्रीय क्रिप्टो जगतात खळबळ माजली आहे.

रोमन नोवाक हे सेंट पीटर्सबर्ग येथील असून त्यांनी स्थापन केलेल्या फिंटोपिओ नावाच्या क्रिप्टो ट्रान्सफर प्लॅटफॉर्मने मोठी गुंतवणूक केली होती. मात्र, त्यांचे आर्थिक करिअर वादांनी भरलेले होते. २०२० मध्ये त्याच्यावर रशियात मोठ्या प्रमाणावर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता, ज्यात शिक्षा भोगल्यानंतर ते दुबईत स्थलांतरित झाले होते. ते बेपत्ता होण्यापूर्वी, गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्यावर अनेक खटले सुरू होते. काही अहवालानुसार, त्यांच्याविरुद्ध तब्बल ५० कोटी डॉलर्स (सुमारे ४,१५० कोटी रुपये) लाटल्याचे  दावे करण्यात आले होते.

हट्टा येथील 'गुप्त' बैठकीत घात

रशियन माध्यमांनुसार, नोवाक दाम्पत्य २ ऑक्टोबर रोजी शेवटचे दिसले होते. ओमान सीमेजवळ असलेल्या हट्टा परिसरातील एका तलावाजवळ एका चालकाने त्यांना सोडले. त्यानंतर एका  गुंतवणूकदारासोबत बैठक असल्याच्या बहाण्याने ते एका दुसऱ्या वाहनात बसले आणि तिथून गायब झाले. पोलिसांनी सांगितले की, एका कथित व्यावसायिक कराराच्या खोट्या बहाण्याने नोवाक दाम्पत्याला एका भाड्याच्या व्हिलामध्ये फूस लावून बोलावण्यात आले. तिथे त्यांचा निर्घृण छळ करण्यात आला. हल्लेखोरांचा उद्देश त्यांच्या डिजिटल क्रिप्टो वॉलेट्सचा अॅक्सेस मिळवणे हा होता. वॉलेट्सचा अॅक्सेस न मिळाल्याने अपहरणाचा हा प्रयत्न फसल्याने हल्लेखोरांनी त्यांची हत्या केली.

रोमन नोवाक आणि त्यांची पत्नी अण्णा नोवाक यांचे मृतदेह ३ ऑक्टोबर रोजी दुबईजवळील एका वाळवंटात विखुरलेले आणि पुरलेले आढळले. ऑक्टोबरच्या सुरुवातीपासून हे जोडपे बेपत्ता होते, नातेवाईकांचा त्यांच्याशी संपर्क तुटल्यानंतर महिनाभरापासून त्यांचा शोध सुरू होता. त्यांना शेवटचे ओमान सीमेजवळ दिसले होते. आफ्रिकेच्या दक्षिण किनाऱ्यावरील केपटाऊन येथे क्रूरपणे नेण्यापूर्वी आणि ४ ऑक्टोबर रोजी बेपत्ता होण्यापूर्वी मोबाईल सिग्नलने जोडप्याला हट्टा आणि ओमानमध्ये शोधले होते. तपास अधिकाऱ्यांची दिशाभूल करण्यासाठी सिग्नलमध्ये बदल करण्यात आले होते.

रशियात संशयित अटकेत

नोव्हेंबरमध्ये या दाम्पत्याचे मृतदेह मिळाल्यानंतर तपास वेगाने सुरू झाला आणि हत्येच्या आरोपावरून अनेक संशयितांना रशियातून अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेले संशयित सर्व रशियन नागरिक आहेत. तपास यंत्रणा या दुहेरी हत्येच्या संपूर्ण परिस्थितीचा छडा लावण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करत आहेत. ५३ वर्षीय कॉन्स्टँटिन शाख्त हा या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार असल्याचा संशय आहे. त्याने आरोपांचे खंडन केले असले तरी, इतर दोन संशयितांनी हत्येची कबुली दिली आहे.

सुरुवातीला खंडणी किंवा चोरीचा हा कट होता, पण हल्लेखोरांना डिजिटल निधीचा अॅक्सेस मिळाला नाही, त्यामुळे हा कट फसून त्याचे रूपांतर हत्येत झाले, असा अंदाज काही सूत्रांनी व्यक्त केला आहे. या घटनेमुळे आंतरराष्ट्रीय क्रिप्टो समुदायात मोठे आश्चर्य आणि भीतीचे वातावरण पसरले आहे, कारण या हाय-प्रोफाइल हत्येमुळे क्रिप्टोकरन्सीशी संबंधित गुन्ह्यांचे गंभीर स्वरूप पुन्हा एकदा समोर आले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Crypto couple murdered in Dubai desert for $50 million.

Web Summary : Russian crypto entrepreneur and his wife were murdered in Dubai over a $50 million dispute. Their bodies were found buried in the desert after a failed extortion attempt for crypto wallets. Suspects have been arrested in Russia.
टॅग्स :DubaiदुबईrussiaरशियाCrime Newsगुन्हेगारी