शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

बांगलादेशात आणखी एका हिंदू तरुणाची हत्या; इंधन भरल्याचे पैसे मागितल्याने अंगावर घातली गाडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2026 17:46 IST

Attacks on Hindus in Bangladesh: बांगलादेशातील राजबारी जिल्ह्यातून एक काळजाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. इंधन भरल्याचे पैसे मागितले म्हणून रिपन साहा या हिंदू तरुणाच्या अंगावर जाणूनबुजून गाडी घालून त्याला ठार मारण्यात आले.

बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदू समुदायावर होणाऱ्या हल्ल्यांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाहीये. राजबारी जिल्ह्यातील सदर उपजिल्हा येथे एका हिंदू तरुणाला जाणूनबुजून वाहनाने चिरडून ठार मारल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी घडली. या घटनेमुळे स्थानिक हिंदू समुदायात भीतीचे वातावरण पसरले आहे.

मृत हिंदू तरुणाचे नाव रिपन साहा (वय, ३०) असे आहे. तो राजबारी येथील गोलंडा मोरे जवळील करीम फिलिंग स्टेशनवर कार्यरत होता. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, एका वाहनचालकाने पंपावर इंधन भरले, मात्र पैसे देण्यास नकार दिला. रिपन साहाने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला असता, आरोपी चालकाने रागाच्या भरात जाणूनबुजून रिपनच्या अंगावर गाडी घातली. या भीषण अपघातात रिपनचा जागीच मृत्यू झाला.

या प्रकरणी पोलिसांनी तत्परता दाखवत वाहन जप्त केले असून, गाडीचा मालक अबुल हाशेम याला अटक केली आहे. हाशेम हा बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीच्या राजबारी जिल्हा युनिटचा माजी कोषाध्यक्ष असल्याची माहिती समोर आली. यासोबतच चालक कमाल हुसेन यालाही बानिभान निपारा गावातून ताब्यात घेण्यात आले. "हा अपघात नसून खुनाचा स्पष्ट प्रकार आहे. आरोपीने पैसे देण्यास नकार दिला तेव्हा पीडित तरुण वाहनासमोर उभा होता, तरीही चालकाने त्याला धडक दिली आणि पळ काढला", अशी माहिती सदर पोलीस ठाण्याचे अधिकारी खोंडकर झियाउर रहमान यांनी दिली.

बांगलादेशात गेल्या काही दिवसांपासून हिंदूंवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली. याच आठवड्यात दागनभुईयान उपजिल्ह्यात समीर दास या हिंदू तरुणाची धारदार शस्त्रांनी हत्या करण्यात आली. त्याचा मृतदेह एका शेतात आढळून आला होता. भारत सरकारने या घटनांबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली आहे. अल्पसंख्याकांच्या सुरक्षेसाठी बांगलादेशच्या अंतरिम सरकारने कठोर पावले उचलावीत, अशी अपेक्षा भारताने व्यक्त केली आहे.मानवाधिकार संघटनांच्या मते, बांगलादेशातील सध्याच्या राजकीय अस्थिरतेच्या काळात अल्पसंख्याक हिंदू समुदाय असुरक्षित झाला असून, त्यांच्यावरील लक्ष्यित हल्ले हे मोठे आव्हान बनले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Hindu youth murdered in Bangladesh over fuel money dispute.

Web Summary : A Hindu youth, Ripon Saha, was deliberately run over and killed in Bangladesh after arguing about fuel payment. Police arrested the vehicle owner, a BNP official, and the driver. Recent attacks on Hindus have raised concerns, prompting India to urge protection for minorities.
टॅग्स :BangladeshबांगलादेशCrime Newsगुन्हेगारीInternationalआंतरराष्ट्रीय