शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
PHOTOS : पती IPL मध्ये तर पत्नी निवडणुकीत 'बिझी', भाजपसाठी रिवाबा जडेजा 'मैदानात'!
19
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
20
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!

जपानमध्ये लिलावात मासा विकला गेला 4 कोटींना

By ऑनलाइन लोकमत | Published: January 09, 2018 12:48 PM

जपानमध्ये एका लिलावात चक्क ४ कोटींना विकला गेलाय, इतकंच नव्हे तर याआधी त्याहून मोठी किंमत मिळाली होती.

ठळक मुद्देएखादा दुर्मिळ मासा सापडल्यावर त्या माशाचा लिलाव केला जातोहा लिलाव फार फार तर हजार किंवा लाखोंच्या घरात असतो.मात्र जपानमध्ये एका माशाला तब्बल 2 कोटींची किंमत मिळाली आहे.

जपान : एखादा दुर्मिळ मासा सापडल्यावर त्या माशाचा लिलाव केला जातो. हा लिलाव फार फार तर हजार किंवा लाखोंच्या घरात असतो. मात्र जपानमध्ये एका माशाला तब्बल 2 कोटींची किंमत मिळाली आहे. ट्युना असं या माशाचं नाव असून या माशाचा दरवर्षी नववर्षाच्या सुरुवातीला लिलाव केला जातो. प्रतिष्ठित हॉटेल व्यावसायिक हा मासा विकत घेतात. 

दि हिंदुने दिलेल्या वृत्तानुसार, जपानमधील त्सुकिजी या मासेबाजारात हा लिलाव केला जातो. हा मासळी बाजार जगातील सगळ्यात मोठा मासळी बाजार आहे असं म्हटलं जातं. 1935 साली सुरू झालेल्या मार्केटमध्ये जगातील प्रत्येक मासा आढळतो. नववर्षाच्या सुरुवातील या मासळी बाजारात ट्युनो या माशाचा लिलाव केला जातो. हा मासा अत्यंत दुर्मिळ असल्याने हा मासा लिलाव करूनच विकला जातो. यंदाच्या लिलावात हा मासा तब्बल 2 कोटींना विकला गेल्याने या माशाची जगभर चर्चा सुरू झाली. अनेक कंपन्यांमध्ये येथे लिलावात बोली लावण्यासाठी प्रसिद्ध कंपन्यांची चुरस पाहायला मिळते. यंदा किओमुरा कंपनीने हा मासा विकत घेतला आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा सापडलेला ट्युना हा वजनाने आणि आकाराने लहान असल्याचं बोललं जात आहे. कारण गेल्यावर्षी ट्युनो चक्क 4 कोटी 33  हजारांना विकला गेला होता. एवढंच नव्हे तर 2013 साली झालेल्या लिलावात ट्युनो मासा जवळपास 12 कोटींना विकला गेला होता. बोली लावण्याआधी प्रत्येक कंपनी आधी माशाची पारख करते. आपण लावत असलेल्या किंमतीच्या पात्रतेच्या हा मासा आहे की नाही याचीही तपासणी केली जाते, मगच अनेक कंपन्या या लिलावात उतरतात.

आणखी वाचा - ब्लू व्हेल मासे बहुतेक आहेत उजवा हात प्रवृत्तीचे

हा मासळी बाजार फार जुना आहे. 480 प्रकारचे मासे या मासळी बाजारात आढळतात. दरदिवशी जवळपास कोटींच्या घरात या मासळीबाजारात उलाढाल होत असते. तसंच नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करून अनेक व्यावसायिक आपला व्यवसाय वृद्धिंगत करत असल्याने ग्राहकांचा ओघ वाढत जात आहे. परंतु, जवळपास 80 वर्षांचा इतिहास असलेला हा मासळी बाजार आता दुसऱ्या जागी स्थलांतरित होणार असल्याचंही सांगण्यात येत आहे. त्यामुळे याबाबतीत अनेकांनी दुःख व्यक्त केलंय. 

टॅग्स :JapanजपानInternationalआंतरराष्ट्रीयMarketबाजार