शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

तेहरानमध्ये रक्ताचा सडा! इराणमध्ये महागाईविरुद्धच्या आंदोलनाला हिंसक वळण; २१७ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 11:33 IST

तेहरानसह इराणमधील अनेक शहरांमध्ये शुक्रवारी रात्री प्रचंड हिंसाचार झाला असून, आतापर्यंत २१७ आंदोलकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

इराणमध्ये गेल्या दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या आंदोलनाने आता अत्यंत रौद्र आणि हिंसक रूप धारण केले आहे. महागाई आणि बेरोजगारीविरुद्ध सुरू झालेली ठिणगी आता थेट धार्मिक नेतृत्वाविरुद्धच्या वणव्यात रूपांतरित झाली आहे. राजधानी तेहरानसह देशातील अनेक शहरांमध्ये शुक्रवारी रात्री प्रचंड हिंसाचार झाला असून, आतापर्यंत २१७ आंदोलकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. परिस्थिती हाताबाहेर गेल्यामुळे इराण सरकारने संपूर्ण देशातील इंटरनेट सेवा खंडित केली आहे.

महागाईच्या विरोधात सुरू झाला होता लढा 

या जनक्षोभाची सुरुवात २९ डिसेंबर २०२५ रोजी झाली होती. इराणच्या चलनाची (रियाल) घसरण आणि वाढत्या महागाईमुळे त्रस्त झालेल्या व्यापाऱ्यांनी सुरुवातीला तेहरानमध्ये दुकाने बंद ठेवून आंदोलन सुरू केले. ३० डिसेंबरला विद्यार्थीही या आंदोलनात सामील झाले. मात्र, हळूहळू या आंदोलनाचा रोख बदलला आणि लोक थेट सत्तेतील धार्मिक नेतृत्वाच्या विरोधात रस्त्यावर उतरले.

हॉस्पिटल्समध्ये मृतदेहांचा ढिगारा 

तेहरानमधील एका डॉक्टरने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील फक्त ६ मोठ्या रुग्णालयांमध्ये २१७ मृतदेहांची नोंद करण्यात आली आहे. यातील बहुतेकांचा मृत्यू गोळीबारात झाला आहे. आंदोलनात आतापर्यंत ५ लाखांहून अधिक लोक सहभागी झाले असून २ हजारांहून अधिक जण जखमी आहेत. या संघर्षात इराणच्या सुरक्षा दलातील १४ जवानही मारले गेले आहेत.

मशिदींना आग आणि बँकांची लूट 

आंदोलकांनी आपला संताप व्यक्त करताना सरकारी मालमत्तेचे मोठे नुकसान केले आहे. तेहरानच्या महापौरांनी दिलेल्या माहितीनुसार, आंदोलकांनी आतापर्यंत २५ मशिदींना आग लावली, २६ बँकांमध्ये मोठी लूट केली, १० सरकारी इमारती खाक केल्या, ४८ अग्निशमन दलाच्या गाड्या आणि ४२ बस जाळून भस्मसात केल्या. लष्कराच्या कॅम्पवरही हल्ले करण्यात आले आहेत.

संपूर्ण देश 'ब्लॅकआऊट'वर 

इराणमधील २० प्रांतांतील सुमारे ११० शहरांमध्ये हे लोण पसरले आहे. परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारने कडक पावले उचलली असून २३०० हून अधिक जणांना अटक करण्यात आली आहे. देशातील सर्व शाळा, कॉलेजेस आणि विद्यापीठे बंद ठेवण्यात आली असून इंटरनेटवर बंदी घातल्यामुळे बाह्य जगाशी इराणचा संपर्क तुटला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Tehran bloodshed: Iran protests over inflation turn violent, 217 dead.

Web Summary : Iran protests against inflation and religious leadership escalate violently. Over 217 dead in Tehran and other cities. Internet shut down amidst widespread unrest, arson, and looting; schools closed.
टॅग्स :IranइराणInternationalआंतरराष्ट्रीय