लाहोर- पाकिस्तानमधील लाहोर येथील दाता दरबारच्या बाहेर स्फोट झाला आहे. या स्फोटात पाच पोलीस कर्मचाऱ्यांसह आठ जणांचा मृत्यू झाला असून, 24 जण जखमी आहेत. पाकिस्तानातल्या जिओ न्यूजच्या वृत्तानुसार, दाता दरबार दर्ग्याच्या बाहेर झालेल्या स्फोटात आठ पोलीस अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. तर या स्फोटात 24 जण जखमी आहेत. ज्यांना उपचारासाठी जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, हा स्फोट पंजाब पोलिसांच्या एलिट फोर्स वॅनला टार्गेट करण्यासाठी करण्यात आला होता. परंतु याची अधिकृतरीत्या खातरजमा झालेली नाही.
Blast In Pakistan: लाहोरमध्ये दाता दरबारच्या बाहेर स्फोट, पाच पोलीस कर्मचाऱ्यांसह आठ जणांचा मृत्यू, 18 जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2019 10:29 IST