शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

बीएलएच्या हल्ल्यांनी पाकिस्तानी सैन्य हादरले, हजारो सैनिकांनी लष्करप्रमुखांकडे राजीनामे पाठवले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2025 14:21 IST

Pakistan Army News: बीएलएकडून एका पाठोपाठ एक होत असलेल्या भयंकर हल्ल्यांमुळे पाकिस्तानी सैन्य हादरलं असून, सैनिकांमध्ये दहशतीचं वातावरण आहे. या हल्ल्यांनंतर मागच्या काही दिवसांत सुमारे दोन हजार ५०० सैनिकांनी सैन्यातील नोकरीचा राजीनामा दिल्याचं वृत्त आहे.

मागच्या आठवडाभरात पाकिस्तानमधील बलुचिस्तान प्रांतामध्ये बंडखोर बलूच लिबरेशन आर्मीने (बीएलए) दोन मोठे हल्ले घडवून आणले आहेत. या हल्ल्यामध्ये पाकिस्तानी सैन्यातील अनेक सैनिक मारले गेले आहेत. तसेच बीएलएकडून एका पाठोपाठ एक होत असलेल्या भयंकर हल्ल्यांमुळे पाकिस्तानी सैन्य हादरलं असून, सैनिकांमध्ये दहशतीचं वातावरण आहे. सातत्याने होत असलेल्या हल्ल्यांचा परिणाम पाकिस्तानी सैन्याच्या मनोधैर्यावर होत असून, या हल्ल्यांनंतर मागच्या काही दिवसांत सुमारे दोन हजार ५०० सैनिकांनी सैन्यातील नोकरीचा राजीनामा दिल्याचं वृत्त आहे.

एका संकेतसस्थळाने विश्वसनीय सूत्रांचा हवाला देत हे वृत्त दिलं आहे. पाकिस्तानी सैन्यामध्ये वाढत असलेली असुरक्षितता, सातत्याने सैनिकांचे जात असलेले बळी आणि पाकिस्तानची ढासळत असलेली आर्थिक स्थिती यामुळे पाकिस्तानी सैन्यामध्ये भीतीचं वातावरण आहे. अनेक पाकिस्तानी सैनिक पाकिस्तानमध्ये आपला जीव धोक्यात घालण्याऐवजी सौदी अरेबिया, कतार, कुवेत आणि संयक्त अरब अमिरातीमध्ये काम करण्याचा पर्याय निवडत आहे. पाकिस्तानी सैन्यामध्ये चिंताजनक परिस्थिती असून, सातत्याने सुरू असलेला हिंसाचार आणि असुरक्षिततेला सामोरे जाण्यास सैनिक अनुत्सुक आहेत.

पाकिस्तानमध्ये बिघडत असलेलील संरक्षणाची व्यवस्था सैनिकांच्या मन:स्थितीला बिघडवत आहे. तसेच सैनिक सैन्यातून मोठ्या प्रमाणावर बाहेर पडत असल्याने पाकिस्तानी सैन्याची ताकद आणि व्यवस्थापनाबाबतची चिंता वाढली आहे. गेल्या काही दिवसांत झालेलं  ट्रेनचं अपहरण आणि काल झालेला आत्मघातकी हल्ला यामुळे पाकिस्तानी सैन्याची चिंता वाढली आहे. या दोन्ही घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर सैनिक मारले गेले आहेत. मात्र पाकिस्तानी लष्कर आणि पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी राजीनाम्यांच्या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही.

दरम्यान, मागच्या काही काळात बलुचिस्तानमध्ये असंतोष वाढत असल्याने या परिसरातील स्थैर्य बिघडले आहे. जाफर एक्स्प्रेसवरील हल्ल्यानंतर बीएलएने आपल्या कारवायांना अधिकच तीव्र केलं आहे. तसेच पाकिस्तानी सैन्याला हादरवण्यासाठी एकापाठोपाठ हल्ले केले जात आहेत.  

टॅग्स :Pakistanपाकिस्तानInternationalआंतरराष्ट्रीयTerror Attackदहशतवादी हल्ला