"बर्ड फ्लू H5N1 हा कोरोनापेक्षा 100 पट जास्त प्राणघातक"; तज्ज्ञांनी दिला गंभीर इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2024 01:01 PM2024-04-05T13:01:08+5:302024-04-05T13:03:00+5:30

बर्ड फ्लू H5N1 च्या संभाव्य धोक्याबद्दल डॉक्टर आणि आरोग्य तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. आरोग्य तज्ञ म्हणतात की, हा नवीन आजार कोरोना महामारीपेक्षा 100 पट जास्त धोकादायक ठरू शकतो.

bird flu h5n1 is 100 times more deadly than corona more than half of the patients have died | "बर्ड फ्लू H5N1 हा कोरोनापेक्षा 100 पट जास्त प्राणघातक"; तज्ज्ञांनी दिला गंभीर इशारा

"बर्ड फ्लू H5N1 हा कोरोनापेक्षा 100 पट जास्त प्राणघातक"; तज्ज्ञांनी दिला गंभीर इशारा

बर्ड फ्लू H5N1 च्या संभाव्य धोक्याबद्दल डॉक्टर आणि आरोग्य तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. आरोग्य तज्ञ म्हणतात की, हा नवीन आजार कोरोना महामारीपेक्षा 100 पट जास्त धोकादायक ठरू शकतो. या फ्लूमुळे निम्म्याहून अधिक लोकांचा मृत्यू होण्याचीही दाट शक्यता आहे. त्यांनी भीती व्यक्त केली आहे की, व्हायरसच्या संसर्गाची पातळी तीव्र होऊ शकते ज्यामुळे जागतिक महामारीचा जन्म होऊ शकतो.

पिट्सबर्गमधील प्रमुख बर्ड फ्लू संशोधक डॉ. सुरेश कुचिपुडी यांनी इशारा दिला आहे की H5N1 मध्ये साथीचा रोग निर्माण होण्याची क्षमता आहे. याचे कारण असे की त्यात मानवांना तसेच अनेक सस्तन प्राण्यांना संक्रमित करण्याची क्षमता आहे.

फार्मास्युटिकल उद्योग सल्लागार आणि कॅनडा-आधारित फार्मास्युटिकल कंपनी बायोनियाग्राचे संस्थापक जॉन फुल्टन यांनी देखील हीच चिंता व्यक्त केली आहे. H5N1 ने महामारीचे रूप धारण केलं तर ते खूप गंभीर असेल असंही त्यांनी म्हटलं आहे. हा कोरोनापेक्षा जास्त प्राणघातक असू शकतो. 

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) नुसार, 2003 पासून H5N1 बर्ड फ्लूची लागण झालेल्या प्रत्येक 100 रुग्णांपैकी 52 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत 887 प्रकरणे नोंदवली गेली आहेत, त्यापैकी एकूण 462 मृत्यू झाले आहेत. त्याच वेळी, कोविड-19 ची लागण झालेल्या रुग्णांचा मृत्यू दर 0.1 टक्क्यांपेक्षा कमी आहे. तथापि, साथीच्या रोगाच्या सुरूवातीस ते सुमारे 20 टक्के होते.

H5N1 म्हणजे काय?

लाइव्ह सायन्समधील रिपोर्टनुसार, H5N1 हा एवियन इन्फ्लूएंझा ए चा उपप्रकार आहे. हा बर्ड फ्लू व्हायरसचा समूह आहे. हे अत्यंत रोगजनक मानलं जातं कारण यामुळे पोल्ट्रीमध्ये गंभीर आणि अनेकदा प्राणघातक रोग होतो. प्रामुख्याने पक्ष्यांना होतो. H5N1 वन्य पक्षी आणि कधीकधी मानवांसह सस्तन प्राण्यांना देखील संक्रमित करू शकतो. हा रोग मानव आणि प्राण्यांसाठी घातक ठरू शकतो. H5N1 व्हायरस पहिल्यांदा 1996 मध्ये चीनमध्ये पक्ष्यांमध्ये आढळून आला होता. एका वर्षानंतर हाँगकाँगमध्ये उद्रेक झाला.
 

Web Title: bird flu h5n1 is 100 times more deadly than corona more than half of the patients have died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.