शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

"पुढच्या 4 ते 6 महिन्यांत कोरोनाचा प्रकोप, परिस्थिती चिंताजनक होणार"; बिल गेट्स यांचा गंभीर इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2020 12:56 IST

Bill Gates And Corona Virus : बिल गेट्स यांनी कोरोनाबाबत भीती व्यक्त केली असून गंभीर इशारा दिला आहे.

जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. सर्वच देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहेत. कोरोनाशी लढण्यासाठी अनेक जण पुढाकार घेत आहेत. संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचे सर्व उपाय करण्यात येत आहेत. जगभरात कोरोना लसीवर युद्धपातळीवर संशोधन सुरू आहे. याच दरम्यान मायक्रोसॉफ्टचे संस्थापक आणि जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेल्या बिल गेट्स यांनी कोरोनाबाबत भीती व्यक्त केली असून गंभीर इशारा दिला आहे. 

बिल गेट्स यांना पुढील चार ते सहा महिन्यांमध्ये कोरोनाचा प्रकोप वाढणार असून परिस्थिती अधिक चिंताजनक होईल अशी भीती व्यक्त केली आहे. गेट्स यांची 'बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशन' ही संस्था कोरोनावरील लस विकसित करण्यासाठी आणि ती जगभरामध्ये उपलब्ध करुन देण्यासाठी सध्या काम करत आहे. अमेरिकेसारखा प्रगत देश कोरोनापुढे हतबल झाला आहे. रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. अमेरिकेमधील कोरोनाची परिस्थिती पाहून गेट्स यांनी हा इशारा दिला आहे.

"कोरोनामुळे दोन लाखांहून अधिक जणांचा होऊ शकतो मृत्यू"

बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशनच्या बिल गेट्स यांनी सीएनएनला एक विशेष मुलाखत दिली. यामध्ये बिल गेट्स यांनी "पुढील चार ते सहा महिने कोरोनामुळे परिस्थिती अत्यंत वाईट होऊ शकते. आयएचएमआय (इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ मॅट्रिक्स अँड एवेल्यूएशन) च्या अंदाजानुसार या कालावधीमध्ये कोरोनामुळे दोन लाखांहून अधिक जणांचा मृत्यू होऊ शकतो. मास्क लावण्यासारख्या इतर नियमांचं पालन केल्या मृत्यूचा हा आकडा कमी होऊ शकतो" असं म्हटलं आहे. 

जगभरात कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यू हे अमेरिकेमध्ये झाले आहेत. तसेच महासत्ता असणाऱ्या या देशात कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे, "जेव्हा मी 2015 मध्ये भविष्यावाणी केली होती तेव्हा मी मृत्यू होणाऱ्यांची संख्या अधिक असण्यासंदर्भात भाष्य केलं होतं. त्यामुळेच हा व्हायरस सध्या जितका घातक आहे त्याहून तो अधिक घातक आणि जीवघेणा होऊ शकतो. अजून आपण या साथीमधला अत्यंत वाईट काळ पाहिलेला नाही. मला सर्वाधिक आश्चर्य हे अमेरिका आणि जगभरातील देशांवर पडलेल्या आर्थिक प्रभावासंदर्भात वाटते. मी जो अंदाज पाच वर्षांपूर्वी व्यक्त केला होता. त्यापेक्षा अनेक पटींनी अधिक परिणाम अर्थव्यवस्थांवर झाला" असंही बिल गेट्स यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने  याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBill Gatesबिल गेटसAmericaअमेरिकाDeathमृत्यू