शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

इम्रान खान यांना मोठा धक्का! 'विश्वासू' फवाद चौधरींनी सोडली साथ, घेतला मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2023 22:46 IST

Pakistan, Imran Khan: फवाद यांनी पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ (PTI) पक्ष सोडला, ट्विटदेखील केले.

Imran Khan Pakistan, Fawad Chaudhary: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या जवळचे लोक त्यांना एक एक करून सोडत आहेत. आता त्यांच्या सरकारमध्ये मंत्री होते इम्रान यांचे माजी सहकारी फवाद चौधरी यांनीही पक्ष सोडण्याची घोषणा केली आहे. बुधवारी फवादने ट्विटर हँडलवरून ही माहिती देत ​​इम्रान यांना आणखी एक झटका दिला. फवाद यांच्या पक्षातून जाण्याने इम्रानसोबतच पीटीआयलाही मोठा धक्का बसला आहे. फवादनेही इम्रान खानसोबतचे संबंध तोडल्याचीही चर्चा आहे. फवाद राजीनामा देण्याच्या काही तास आधी इम्रान म्हणाले होते की, त्यांच्या पक्षाच्या नेत्यांना 'जबरदस्तीने घटस्फोट' घ्यायला लावला जात आहे.

राजकारणातून ब्रेक घेत असल्याची माहिती

फवादने त्यांच्या ट्विटर हँडलवर लिहिले की, "माझ्या आधीच्या विधानाचा संदर्भ घेऊन, ज्यात मी 9 मेच्या घटनांचा स्पष्ट निषेध केला होता, मी राजकारणातून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळेच मी पक्षाच्या पदाचा राजीनामा दिला असून इम्रान खान यांच्यापासूनही लांब होत आहे. फवाद आता पीटीआय नेत्यांच्या लांबलचक यादीचा एक भाग बनले आहेत, ज्यांनी 9 मेच्या हिंसाचारानंतर पीटीआय सोडण्याची घोषणा केली आहे. इम्रान खान यांना इस्लामाबाद उच्च न्यायालयातून अटक केल्यानंतर देशभरात हिंसाचार उसळला होता. अल-कादिर ट्रस्ट प्रकरणात नॅशनल अकाउंटेबिलिटी ब्युरोने (एनएबी) इम्रानला अटक केली होती.

डॉ. शिरीन माजरी, फैयाझुल हसन चौहान, मलिक अमीन अस्लम, महमूद मौलवी, आमिर कयानी, जय प्रकाश, आफताब सिद्दीकी आणि संजय गंगवानी यांच्यासह अनेक नेते पीटीआयमधून आतापर्यंत गेले आहेत. इस्लामाबादमध्ये माध्यमांशी बोलताना शिरीनने पक्ष सोडण्याची घोषणा केली होती. आपण केवळ पक्षच सोडत नाही तर सक्रिय राजकारणाचाही निरोप घेत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. १२ दिवसांच्या तुरुंगवासात त्यांची आणि त्यांची मुलगी इमान मजारी हिला खूप त्रास झाल्याचे त्यांनी सांगितले. शिरीनच्या यांच्या शब्दात सांगायचे तर, 'माझ्या मुलांसाठी, कुटुंबासाठी आणि आरोग्यासाठी मी राजकारण सोडत आहे. माझे कुटुंब आणि मुले ही माझी पहिली प्राथमिकता आहे. 9 आणि 10 मे रोजी घडलेल्या घटनांचा मी निषेध करते,' असे त्या म्हणाल्या.

इम्रान काय म्हणाले?

तज्ज्ञांच्या मते, पीटीआयचे नेते ज्या प्रकारे पक्ष सोडत आहेत, ती पद्धत केवळ पीटीआय कमकुवत करणार नाही तर पाकिस्तानच्या आधीच कमकुवत झालेल्या लोकशाहीलाही धोका निर्माण करेल. तथापि, इम्रानवर विश्वास ठेवला तर, त्यांच्या नेत्यांना 'बंदुकीच्या जोरावर' पक्षातून 'जबरदस्तीने घटस्फोट' दिला जात आहे. राजकीय जाणकारांच्या मते, हे पीटीआय फोडून वेगळा गट तयार करण्याचे प्रयत्न आहेत, जसे पीएमएल-एनचे विभाजन होऊन रातोरात पीएमएल-क्यू पक्षाची स्थापना झाली.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानImran Khanइम्रान खानPoliticsराजकारण