शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
2
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
3
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
4
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
5
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
6
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
7
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
8
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
9
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
10
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
11
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
12
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
13
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
14
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
15
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
16
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
17
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
18
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
19
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
20
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी

पाकिस्तानातील विरोध संपणार; इम्रान खान यांच्या PTI पक्षावर बंदी घालण्याची तयारी, कारण काय...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2024 16:53 IST

पाकिस्तान सरकारने पाकिस्तान तहरीक-ए-इंसांफ(PTI) पक्षावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.

PTI Banned in Pakistan : तुरुंगात कैद असलेले पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना मोठा धक्का बसला आहे. पाकिस्तान सरकारने त्यांचा पक्ष पाकिस्तान तहरीक-ए-इंसांफ(PTI) वर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. इम्रान यांच्यावर दंगल भडकवणे, लाच घेणे आणि देशाच्या प्रमुखपदी असताना मिळालेल्या भेटवस्तू विकण्याचा आरोप आहे. पाकिस्तानातील मंत्री अताउल्लाह तरार यांनी याची पुष्टी केली आहे.

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अडचणीत सातत्याने वाढ होत आहे. अलीकडेच पाकिस्तानमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत इम्रान यांच्या पक्षाला निवडणूक लढवण्याची परवानगी नाकारण्यात आली होती. त्यानंतर त्यांच्या समर्थकांनी अपक्ष निवडणूक लढवली आणि सर्वाधिक जागा जिंकल्या. पण, इतर पक्ष एकत्र आल्यामुळे इम्रान खान यांना सरकार स्थापन करता आले नाही. आता तर थेट त्यांच्या पक्षावरच बंदी घालण्याची तयारी सरकारने केली आहे.

पीटीआयवर बंदीचे सबळ पुरावेपाकिस्तानचे सूचना मंत्री अताउल्लाह तरार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, पाकिस्तान सरकारने देशविरोधी कारवायांमुळे इम्रान खान यांच्या पीटीआय पक्षावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. इम्रान खान आणि पाकिस्तानचे माजी अध्यक्ष आरिफ अल्वी यांच्या विरोधात कलम 6 अंतर्गत देशद्रोहाचा गुन्हा नोंदवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. पीटीआयच्या विरोधात विदेशी फंडिंग, 9 मे रोजी झालेली दंगल, सायफर प्रकरण आणि अमेरिकेत मंजूर केलेला ठराव, याबाबत सबळ पुरावे आहेत, असेही ते म्हणाले. 

क्रिकेटर ते देशाचे पंतप्रधान, असा प्रवास...पाकिस्तानला पहिला क्रिकेट वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या इम्रान खान यांनी 1996 मध्ये पीटीआयची स्थापना केली होती. पक्ष स्थापनेच्या 22 वर्षांनंतर, म्हणजेच 2018 मध्ये पक्ष सत्तेवर आले, पण 2022 मध्ये विश्वासदर्शक ठरावात पराभूत होऊन सत्ता सोडावी लागली. यानंतर झालेल्या निवडणुकीत नवाझ शरीफ यांचा पक्ष पीएमएल-एन आणि आसिफ अली झरदारी यांच्या पीपीपीने सोबत येऊन देशात सरकार स्थापन केले. इम्रान खान यांना एप्रिलमध्ये सत्तेतून बेदखल केल्यानंतर अटक करण्यात आली होती. यानंतर त्यांच्या समर्थकांनी देशात खुप गोंधळ घातला. पाकिस्तानी लष्कराच्या अनेक आस्थापनांवरही हल्ले झाले. त्या घटनेलाच देशविरोधी कृत्य मानण्यात आले आहे. त्यामुळेच सरकार आता सर्वोच्च न्यायालयात जाणार असून पीटीआयवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानImran Khanइम्रान खानInternationalआंतरराष्ट्रीयNawaz Sharifनवाज शरीफ