शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना मोठा धक्का! निवडणूक आयोगाने रद्द केली उमेदवारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2023 22:09 IST

पाकिस्तानमध्ये ८ फेब्रुवारीला होणार सार्वत्रिक निवडणुका

Imran Khan, Pakistan Elections: पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने शनिवारी माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) चे प्रमुख इम्रान खान यांचे २०२४ च्या राष्ट्रीय निवडणुका लढवण्यासाठी केलेले नामांकन नाकारले. माजी पंतप्रधानांनी २०२४ची राष्ट्रीय निवडणूक लढवण्यासाठी त्यांचे मूळ गाव मियांवली येथून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने सांगितले की, खान यांचा उमेदवारी अर्ज नाकारण्यात आला, कारण ते मतदारसंघात नोंदणीकृत मतदार नव्हते. त्यांना न्यायालयाने दोषी ठरवून अपात्र ठरवले आहे. यादरम्यान, इम्रान खानच्या मीडिया टीमनेही पुष्टी केली की आयोगाने त्यांचा मियांवलीमधून निवडणूक लढवण्याचा अर्जही नाकारला आहे. यासोबतच लोहारमधून त्यांचा उमेदवारी अर्जही फेटाळण्यात आला आहे.

इम्रान खान सायफर प्रकरणात या वर्षी ऑगस्टपासून तुरुंगात आहेत. त्यांच्यावर गोपनीय कागदपत्रे लीक केल्याचा आरोप होता. पीटीआयच्या प्रमुखाने मार्चमध्ये पाकिस्तानच्या वॉशिंग्टन दूतावासाने पाठवलेल्या गुप्त राजनैतिक कागदपत्राचा खुलासा केला होता. तथापि, पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने गेल्या शुक्रवारी इम्रान खान यांना देशाची गुपिते लीक केल्याच्या प्रकरणात जामीन मंजूर केला होता. पण उच्च न्यायालयाने निवडणुकीत भाग घेण्यापासून त्यांची अपात्रता स्थगित करण्यास नकार दिल्यानंतर एक दिवसानंतर हा निर्णय आला.

एका लेखी आदेशात, सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी सांगितले की त्यांना पुरेशा सबळ पुराव्यांअभावी जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्यानंतर इम्रान खान निवडणूक लढवू शकतील, अशी शक्यता वर्तवली जात होती, मात्र आता निवडणूक आयोगाने उमेदवारी नाकारल्याने त्यांना पुन्हा मोठा धक्का बसला आहे.

टॅग्स :Imran Khanइम्रान खानPakistan Electionsपाकिस्तान निवडणूकElectionनिवडणूक