शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Panjshir Valley: युक्रेनची सीमा धगधगत असताना पंजशीरमधून मोठी बातमी; पाकिस्तानच्या एन्ट्रीमुळे पुन्हा लढाई सुरु झाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2022 22:49 IST

Panjshir Valley War Started: अद्याप संपूर्ण परिसर तालिबानच्या ताब्यात गेलेला नाही. यामुळे हा पंजशीर ताब्यात घेण्यासाठी तालिबान जोरदार प्रयत्न करत आहे. अलीकडेच पंजशीरमध्ये स्थानिक लोक आणि तालिबानी लढवय्यांमधील रक्तरंजित संघर्षाचा नवा वाद समोर आल्यानंतर पुन्हा एकदा लढाई सुरू झाली आहे.

एकीकडे रशिया आणि युक्रेनच्या सीमेवर कधीही युद्ध भडकण्याची चिन्हे असताना रशियादेखील जिंकू न शकलेल्या पंजशीर घाटीतून मोठी बातमी येत आहे.अफगानिस्तानच्या निर्वासित सरकारचे काळजीवाहू राष्ट्रपती म्हणून घोषित करणाऱ्या अमरुल्ला सालेह यांनी पंजशीर घाटीत काहीतरी मोठे घडत असल्याचा दावा केला आहे. पाकिस्तानचे अनेक स्नायपर्स त्यांच्या अधिकाऱ्यांसह पंजशीर घाटीत घुसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. 

अफगानिस्तानमध्ये पंजशीर हा असा एकमेव भाग होता जो रशियाला देखील जिंकता आला नव्हता. त्यावर आता हक्कानी गट आणि तालिबानने ताबा मिळविला आहे. बुधवारी याच हक्कानी गटाच्या शेकडो दहशतवाद्यांसोबत डझनावर पाकिस्तानी स्नायपर्स आणि त्यांचा अधिकारी पंजशीर घाटीत आल्याचा दावा सालेह यांनी केला आहे. पंजशीर घाटीमध्ये पाकिस्तानी तंबू आणि अन्न धान्याशी संबंधीत साहित्य दिसले आहे. याबाबत लवकरच पुरावे दिले जातील, असेही सालेह म्हणाले. 

या आठवड्याच्या सुरुवातीला विरोधी पक्षनेते सालेह यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना तालिबानचा सर्वोच्च नेता हिबतुल्ला अखुंदजादा यांचे मुखपत्र म्हणून काम केल्याबद्दल निशाणा साधला. आयएसआय कट्टरपंथी दहशतवादी संघटनेला गुप्तचर माहिती पुरवत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

अद्याप संपूर्ण परिसर तालिबानच्या ताब्यात गेलेला नाही. यामुळे हा पंजशीर ताब्यात घेण्यासाठी तालिबान जोरदार प्रयत्न करत आहे. अलीकडेच पंजशीरमध्ये स्थानिक लोक आणि तालिबानी लढवय्यांमधील रक्तरंजित संघर्षाचा नवा वाद समोर आल्यानंतर पुन्हा एकदा लढाई सुरू झाली आहे.मीडिया रिपोर्ट्सनुसार, तालिबानने अफगाणिस्तानच्या पंजशीर प्रांतातील परंध खोऱ्याला वेढा घातला असून तेथे राहणाऱ्या अनेक लोकांना ताब्यात घेतले आहे. पंजशीरमध्ये तालिबानी वाहनाचा स्फोट झाल्यानंतर स्थानिक लोक आणि तालिबान यांच्यात संघर्ष सुरू झाला. ७ फेब्रुवारीपासून खोऱ्यात संघर्ष सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.तालिबानने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये अफगाणिस्तानचा ताबा घेतल्यानंतर तेथील लोकांची परिस्थिती बिकट झाली आहे. त्याचबरोबर अडचणी असतानाही पंजशीरची जनता लढत आहे.

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानPakistanपाकिस्तान