शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
2
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
3
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
4
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
5
Operation Sindoor Live Updates: भारतीय सैन्यदलांनी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर श्रीनगरमधील लाल चौकातही जल्लोष
6
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
7
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
8
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
9
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
10
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
11
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
12
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
13
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
14
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
15
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
16
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
17
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
18
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
19
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
20
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!

Russia-Ukraine War: अमेरिका-रशिया तणातणीच्या जगाला बसणार मोठ्या झळा; नेमका काय होणार परिणाम? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2022 08:13 IST

तेल-गॅस आयातीवर निर्बंध; बड्या देशांमधील संबंध आणखी बिघडले

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : रशिया युक्रेन युद्धाला १३ दिवस उलटून गेले असून, याचा परिणाम आता जगभरात दिसू लागला आहे. युक्रेनवरील हल्ले रशिया थांबवत नसल्याने अमेरिकेने रशियाच्या तेल आणि गॅस आयात करण्यावर बंदी घातली आहे. राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी यासंदर्भात घोषणा केली. यावेळी ब्रिटननेही रशियाच्या तेल आणि वायू आयातीवरील अवलंबित्व संपुष्टात आणण्याची घोषणा केली आहे. यामुळे रशिया आणि इतर देशांचे संबंध आणखी ताणले गेले आहेत.

ते करार करण्यासाठी अमेरिकेने व्हेनेझुएलामध्ये अधिकारी पाठवले आहेत. आतापर्यंत अमेरिका आणि व्हेनेझुएला यांच्यातील संबंध खराब राहिले आहेत. व्हाईट हाऊसमधील अधिकारी जेन साकी यांनी सांगितले की, अमेरिकेच्या निर्बंधांना न जुमानता इराणकडून कच्चे तेल घेतले जाऊ शकते. अणुकराराच्या चर्चेत तेलाचाही सहभाग आहे.

मॅकडोनाल्ड्स, कोका-कोला आणि स्टारबक्स रशियातून बाहेररशिया आणि युक्रेन युद्धामुळे मॅकडोनाल्ड्स, कोका-कोला आणि स्टारबक्स  यांनी रशियातील आपली सेवा थांबवली आहे. याचा मोठा फटका रशियाला बसणार आहे. मॅकडोनाल्ड्स रशियातील ८०० रेस्टॉरंट तर स्टारबक्स १०० कॉफी शॉप बंद करणार आहे. हेनकेन बिअरनेही रशियातील उत्पादन आणि विक्री थांबवली आहे. जरी कंपन्यांनी रशियातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असला तरी त्या तेथील कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणार नाहीत, त्यांना वेळेवर पगार दिला जाईल, असे सांगण्यात आले.

भारताला रशियाची ऑफरअडचणीत सापडलेल्या रशियन कंपन्या २५-२७ टक्के सूट देऊन भारतासह अनेक देशांना कच्चे तेल विकण्याची ऑफर देत आहेत. मात्र ते भारतात आणण्यात अनेक अडचणी आहेत. वाहतुकीसाठी खर्च केला तर आता जितके पैसे मोजावे लागत आहेत तितकेच पैसे रशियाला द्यावे लागतील.

युद्धाचा वाईट परिणाम; महागाई दीर्घकाळ : राजनरशिया - युक्रेनमधील युद्धामुळे भारतासह जगभरात महागाई वाढेल आणि अर्थव्यवस्थेचा वेग मंदावेल. देशांना त्यांचा विकास टिकविणेही कठीण होईल, असे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी म्हटले आहे.

...तर जगावर आर्थिक संकट : रशियाचा मोठा इशारातेल हे रशियासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. रशिया दररोज ८० लाख बॅरल तेलाचे उत्पादन करतो आणि जगातील ८० देशांना ते पुरवतो. रशियाच्या तेलाचा वापर युरोपमध्ये २५ टक्के, तर चीनमध्ये १५ टक्के आहे. तर रशियाचे तेल भारत केवळ २ टक्के वापरतो. रशियाच्या तेलावरील बंदीमुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर संकट ओढवेल, असा इशारा रशियाचे उपपंतप्रधान अलेक्झांडर नोव्हाक यांनी दिला आहे.

nकच्चे तेल आणखी महाग होणारnते २००८च्या पातळीवर म्हणजेच १४८ डॉलर प्रति बॅरलपेक्षा अधिक वाढेलnरशिया बाजारात तेल ओतेल nमहाग तेल, नैसर्गिक वायू आणि वस्तूंच्या वाढत्या किमती, विजेसाठी अधिक खर्च यामुळे महागाई वाढण्याची शक्यताnवापरलेल्या कार आणि इतर टिकाऊ वस्तूंच्या किमती कमी होतीलnअनेक कामगार घरातून काम करण्याचा पर्याय निवडतील

टॅग्स :Russia Ukrainयुक्रेन आणि रशिया