ढाका: बांगलादेशमध्ये शेख हसीना यांच्या सत्तांतरासाठी कारणीभूत असलेल्या 'नॅशनल सिटीझन पार्टी' (NCP) या नव्या राजकीय शक्तीच्या प्रचंड सुप्त सत्तापिपासू वृत्तीमुळे विद्यार्थी आंदोलनाचा मास्टरमाईंड नाराज झाला आहे. त्याने बांगलादेशमधील सर्वात मोठी इस्लामिक संघटना 'जमात-ए-इस्लामी' सोबत जाण्यास विरोध केला असून सोबत असलेले आंदोलक विद्यार्थी नेते ऐकत नसल्याने आंदोलकांचीच साथ सोडली आहे.
बांगलादेशात राजकीय उलथापालथ थांबण्याचे नाव घेत नाहीये. आता आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर 'नॅशनल सिटीझन पार्टी' (NCP) या नव्या राजकीय शक्तीचा उदय झाला असून, यात विद्यार्थी आंदोलनाचे मुख्य चेहरे नहीद इस्लाम आणि महफूज आलम यांची भूमिका निर्णायक ठरणार होती. परंतू, आलम याने या पक्षापासून फारकत घेतल्याने आंदोलकांना मोठा धक्का बसला आहे.
जमात-ए-इस्लामीसोबत नवी समीकरणे? बांगलादेशमधील सर्वात मोठी इस्लामिक संघटना 'जमात-ए-इस्लामी' आणि विद्यार्थी नेत्यांनी स्थापन केलेली ही नवी पार्टी यांच्यात छुपी युती होत होती. अंतरिम सरकारचे मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांचे 'ब्रेन' मानले जाणारे महफूज आलम हे या नव्या राजकीय रचनेचे सूत्रधार असल्याचे बोलले जात होते. परंतू या संघटनेशी युती करण्यासाठी नहीद इस्लाम याचे कारस्थान सुरु होते हे आता समोर आले आहे.
या पार्श्वभूमीवर आलम याने आपण या युतीचा हिस्सा बनणार नसल्याचे फेसबुक पोस्टमध्ये जाहीर केले यानंतर एनसीपीच्या तीस हून अधिक नेत्यांनी एक निवेदन जाहीर करत जमात ए इस्लामी सोबत जाण्यास विरोध केला, तसेच अन्य काही नेत्यांनी राजीनामे दिले. जुलैमध्ये याच नेत्यांच्या नेतृत्वात बांगलादेशात हिंसक आंदोलन उभे राहिले होते. आता निवडणूक जाहीर होताच सत्तापिपासू नेत्यांनी जातीयवादी जमात-ए-इस्लामीसोबत युती करत निवडणूक लढविण्याची आणि सत्ता हस्तगत करण्याचे कारस्थान रचले आहे.
Web Summary : Bangladesh's political landscape shifts as a student protest mastermind departs the National Citizen Party (NCP) due to disagreements over allying with Jamaat-e-Islami. Internal power struggles and the pursuit of political gain have fractured the movement, impacting upcoming elections.
Web Summary : बांग्लादेश का राजनीतिक परिदृश्य बदल रहा है क्योंकि जमात-ए-इस्लामी के साथ गठबंधन को लेकर असहमति के कारण एक छात्र विरोध के मास्टरमाइंड ने नेशनल सिटीजन पार्टी (एनसीपी) छोड़ दी। आंतरिक सत्ता संघर्ष और राजनीतिक लाभ की खोज ने आंदोलन को तोड़ दिया है, जिससे आगामी चुनाव प्रभावित हो रहे हैं।