शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानला मोठा धक्का! बलुचिस्तानच्या लष्कराने एक शहर ताब्यात घेतले, अनेक पोलीस ठाणी जाळली

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 22:37 IST

बलुचिस्तान आर्मीने पाकिस्तानमधील एका शहरावर ताबा मिळवला आहे. यासोबतच अनेक पोलिस स्टेशन्सना आग लावण्यात आली आहे.

पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे. बलुचिस्तान आर्मीने पाकिस्तानमधील एका शहरावर ताबा मिळवला आहे. यासोबतच अनेक पोलीस ठाण्यांना आग लावली आहे. याबाबत बलुचिस्तान पोस्टने एक पोस्ट शेअर केली आहे. या व्हिडिओमध्ये शहरातील अनेक ठिकाणी काळा धूर आणि ज्वाला उठताना दिसत आहेत. पाकिस्तानमधील सुरब शहराचा ताबा घेतल्याचा दावा बलुचिस्तानने घेतला आहे. यासोबतच सौरभ लेवी पोलीस ठाण्याला आग लावली आहे. यासोबतच त्यांनी या शहरातील प्रमुख बँका आणि सरकारी इमारतींवरही ताबा मिळवला आहे.

तुर्की एअरलाइन्ससोबतचा करार रद्द करा, भारत सरकारने इंडिगोला निर्देश दिले

ही घटना पाकिस्तानचे लष्करप्रमुख असीम मुनीर आणि शाहबाज शरीफ यांच्यासाठी मोठा धक्का आहे. बलुचिस्तान पोस्टने दिलेल्या माहितीनुसार, शेकडो बलुच लिबरेशन आर्मीच्या सैनिकांनी संपूर्ण सुरब शहर ताब्यात घेतले आहे. बीएलए कमांडरनी दावा केला आहे की त्यांनी लेव्ही आणि पोलिस स्टेशन तसेच बँका आणि इतर सरकारी इमारती ताब्यात घेतल्या आहेत. पाकिस्तानी सैन्य आणि पोलिसांना अनेक ठिकाणांहून मारण्यात आले आहे आणि हाकलून लावण्यात आले आहे.

सुरब शहर ताब्यात घेतल्यानंतर बीएलएने निवेदन प्रसिद्ध केले

बलुचिस्तान पोस्टने दिलेल्या माहितीनुसार, सुरब या महत्त्वाच्या शहरावर पूर्ण नियंत्रण मिळवल्यानंतर, बीएलएचे प्रवक्ते जयंद बलोच यांनी प्रसिद्ध केलेल्या एका संक्षिप्त निवेदनात म्हटले आहे की, सुरब शहरातील बँक, लेव्ही स्टेशन आणि पोलिस स्टेशनसह महत्त्वाच्या सरकारी ऑफिसवर दहशतवाद्यांनी ताबा मिळवला आहे, तर मुख्य क्वेटा-कराची महामार्ग आणि सुरब-गदर रस्त्यावरही तपासणी आणि गस्त सुरू आहे.

शुक्रवारी संध्याकाळी, मोठ्या संख्येने सशस्त्र लोकांनी शहरातील विविध सरकारी इमारतींवर हल्ला केला. या दरम्यान अनेक अधिकाऱ्यांना ओलीस ठेवण्यात आले, तर काही सरकारी वाहने जाळण्यात आली. या घटनेवर पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी अद्याप कोणतेही अधिकृत निवेदन जारी केलेले नाही. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तान