शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

पाकिस्तानी एअरफोर्सला मोठा झटका; एअरबेसवरील हल्ल्यात ३५ सैनिकांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2023 13:21 IST

पाकिस्तानने चीनसारखीच माहिती लपविली; पाकिस्तानी सैन्याला आता राजकारणातून लक्ष काढून घेऊन आतील समस्यांवर लक्ष केंद्रीत करण्याची वेळ आल्याचे जाणकार म्हणत आहेत.

रावळपिंडी : काही दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या  हवाई दलाच्या तळावर मोठा दहशतवादी हल्ला झाला होता. य़ावर पाकिस्तानने जसे चीन करते  तशा बऱ्याच गोष्टी लपविण्याचा प्रयत्न केला आहे. परंतू, हळूहळू पाकिस्तानला झालेल्या नुकसानीची माहिती समोर येऊ लागली आहे. पंजाबच्या मियांवाली एअरबेसवरील हल्ल्यात पाकिस्तानला आतापर्यंतचा सर्वात मोठा झटका बसला आहे. 

पाकिस्तानी सैन्याला आता राजकारणातून लक्ष काढून घेऊन आतील समस्यांवर लक्ष केंद्रीत करण्याची वेळ आल्याचे जाणकार म्हणत आहेत. परवाच्या हल्ल्यात पाकिस्तानी सैन्याला मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. 

3 नोव्हेंबर रोजी मियांवली एअरबेसवर झालेल्या हल्ल्यात पाकिस्तानी हवाई दलाची 14 विमाने नष्ट झाली होती आणि 35 सैनिकांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. पाकिस्तानच्या सुरक्षा यंत्रणांना दहशतवादापासून मुक्ती मिळाल्याचा गैरसमज होता, असे लंडनच्या किंग्ज कॉलेजमध्ये वॉर स्टडीज डिपार्टमेंटमध्ये वरिष्ठ फेलो म्हणून पोस्ट केलेल्या आयशा सिद्दीका यांनी म्हटले आहे. 

या हल्ल्याद्वारे दहशतवाद्यांनी पाकिस्तानी हवाई दलाचे प्रशिक्षण केंद्र हे सर्वात कठीण लक्ष्य काबीज करण्याची क्षमता दाखविण्याचा प्रयत्न केला होता. या द्वारे पाकिस्तानी लष्कराचे डोळे उघडले असे त्यांनी द प्रिंटमध्ये छापलेल्या लेखात म्हटले आहे. 

तहरीक-ए-जिहाद पाकिस्तान (TJP) या तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP) शी संलग्न संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. 2009 मध्ये आर्मी जनरल हेडक्वार्टर (GHQ), 2011 मध्ये मेहरान नेव्हल एअर बेस, 2012 मध्ये मिन्हास एअर बेस आणि 2015 मध्ये बदाबेर नॉन-फ्लाइंग एअर बेस या ठिकाणी हल्ले केले होते. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानTerror Attackदहशतवादी हल्ला