शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
5
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
6
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
7
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
8
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
9
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
10
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
11
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
12
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
13
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
14
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
15
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
16
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
17
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
18
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
19
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
20
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

‘कोरोनाबाबतचा भारताचा प्रस्ताव न स्वीकारण्याची बायडेन यांच्याकडे मागणी’

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2021 06:19 IST

इटलीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या ३० लाखांवर पोहोचली आहे. जगात कोरोनाची पहिली लाट आली त्या वेळेसही इटलीमध्ये या संसर्गाने मोठा हाहाकार माजविला होता.

वॉशिंग्टन : कोरोना संसर्गाशी संबंधित कोणत्याही संशोधनाचे बौद्धिक संपदा हक्क सर्वांनीच सोडून द्यावेत अशा आशयाचा प्रस्ताव भारत, दक्षिण आफ्रिकेसह आणखी काही देश जागतिक व्यापार संघटनेला सादर करणार आहेत. हा प्रस्ताव अमेरिकी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी स्वीकारू नये, अशी मागणी त्या देशातील रिपब्लिकन पक्षाच्या चार सिनेटरनी केली आहे.

माईक ली, टॉम कॉटन, जोनी एर्नस्ट, टॉड यंग अशी या सिनेटरची नावे आहेत. त्यांनी बायडेन यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, भारत, दक्षिण आफ्रिकेसह इतर देशांचा प्रस्ताव जागतिक व्यापार संघटनेने स्वीकारला तर त्यामुळे कोरोना संसर्गासंदर्भातील नव्या लसी तसेच औषधांसाठी होणाऱ्या संशोधनाला खीळ बसेल. या चार सिनेटरनी म्हटले आहे की, प्रस्ताव मंजूर झाल्यास अमेरिकी कंपन्यांनी आजवर कोरोनावरील औषध संशोधनासाठी जी मेहनत घेतली ती वाया जाईल. केवळ उत्पादननिर्मिती कंपन्यांना महत्त्व प्राप्त होईल. नव्या कोरोना लसीचे काम अशा प्रस्तावामुळे बंद पडण्याचीही शक्यता आहे. 

लसपुरवठ्यावर परिणाम होणार?भारत, दक्षिण आफ्रिकेसह काही देशांनी सादर केलेला प्रस्ताव जागतिक व्यापार संघटनेत मंजूर झाला तर त्यामुळे कोरोना लसींच्या पुरवठ्यावरही परिणाम होणार आहे, असेही रिपब्लिकन पक्षाच्या चार सिनेटरनी अमेरिकी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

जगभरात कोरोनातून बरे झाले सव्वानऊ कोटी जगामध्ये कोरोना रुग्णांची संख्या ११ कोटी ६७ लाख असून, त्यातील ९ कोटी २३ लाख जण बरे झाले व २५ लाख ९२ हजार लोकांचा बळी गेला. जगभरात २ कोटी १८ लाख रुग्ण.

इटलीत ३० लाख रुग्णइटलीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या ३० लाखांवर पोहोचली आहे. जगात कोरोनाची पहिली लाट आली त्या वेळेसही इटलीमध्ये या संसर्गाने मोठा हाहाकार माजविला होता.

भारतात  रुग्ण व बळींची संख्या अमेरिकेपेक्षा कमी आहे. ब्राझिलमध्ये १ कोटी ८७ लाख रुग्ण व २ लाख ६२ हजार बळी गेले आहेत.

अमेरिकेत२ कोटी ९५ लाखरुग्ण

2 कोटी

लोक बरे झाले. 

 

 

टॅग्स :Joe Bidenज्यो बायडनCorona vaccineकोरोनाची लसAmericaअमेरिका