भूतान फार आनंदी देश नाही, चिनी मीडियाचा कांगावा

By Admin | Published: July 6, 2017 04:12 PM2017-07-06T16:12:16+5:302017-07-06T16:13:12+5:30

भूतान हा फार आनंदी देश नसल्याचा कांगावा चिनी मीडियानं सुरू केला आहे.

Bhutan is not a happy country, but it is the Chinese media | भूतान फार आनंदी देश नाही, चिनी मीडियाचा कांगावा

भूतान फार आनंदी देश नाही, चिनी मीडियाचा कांगावा

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत
बीजिंग, दि. 6 - भूतान हा फार आनंदी देश नसल्याचा कांगावा चिनी मीडियानं सुरू केला आहे. हॅप्पीनेस इंडेक्समध्ये भूतान सर्वोच्च स्थानावर असला तरी त्या देशातील लोक आनंदी नाहीत, असं चिनी मीडियानं म्हटलं आहे. चिनी मीडियानं आता भारताला लक्ष्य करत भूतानवर निशाणा साधला आहे. भारत-चीनच्या वादात भूतानही सामील झाल्यामुळे चीनच्या पायाखालची जमीन सरकली आहे. भूतान हा भारताच्या दबावाखाली आहे, त्यामुळे दिल्लीतल्या हुकूमशाहांचा आदेश मानण्याशिवाय भूतानकडे दुसरा पर्याय नाही.

ग्लोबल टाइम्समध्ये छापून आलेल्या लेखातून भूतानवर टीका करण्यात आली आहे. भूतान हा आनंदी देश नाही. भारताच्या दबावामुळेच भूतानमधील लोक नाखूश आहेत. भूतानमधील जवळपास 1,00,000 लोकांना निर्वासित करण्यात आलं आहे. भारताच्या चुकीमुळेच भूतानला असं करावं लागलं आहे.

भूतानच्या सीमेचे आम्ही उल्लंघन केलेले नाही, असे चीनने गेल्या काही दिवसांपूर्वी म्हटले होते. चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने (पीएलए) आमच्या सीमेचे उल्लंघन केल्याचा आरोप भूतानने केला होता. आमचे सैन्य ‘चीनच्या भूभागातच’ तैनात असून भारताने ‘स्वत:च्या चुका’ दुरुस्त करून घ्याव्यात, असे चीनच्या संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्याने म्हटले होते.

चीनच्या सैनिकांनी भूतानच्या भूभागात प्रवेश केल्याचे तुमचे म्हणणे मला सुधारायचे आहे. चिनी सैनिक चीनच्याच भूभागात तैनात आहेत, असे हा प्रवक्ता प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाला होता. भारताच्या सैनिकांनी सिक्कीम सेक्टरमधील डोंगलोंग भागातील चीनच्या बाजूकडून प्रवेश केल्याचा आरोपही त्याने केला होता. भारतीय जवानांनी नित्याची कामे थांबवण्याचा प्रयत्न केला होता. चीनने स्वायत्तता सुरक्षित राखणे आणि भूभागाची एकात्मता जपण्यासाठी या कामांना योग्य तो प्रतिसाद दिला, असेही त्याने म्हटले होते. भारताने केलेल्या चुकीच्या गोष्टी दुरुस्त करून घ्याव्यात आणि चीनच्या भूभागातून सगळ्या सैनिकांना काढून घ्यावे, असे आम्ही स्पष्ट केले होते.
आणखी वाचा
(भूतानच्या सीमेचे आम्ही उल्लंघन केले नाही, चीनचा दावा)
 
भूतानने त्याच्या डोंगलांगमधील झोंपलरी भागात असलेल्या लष्करी छावणीकडे चीन बांधत असलेल्या रस्त्याला बुधवारी आक्षेप घेतला होता. चीनचं रस्त्याचं बांधकाम थांबवून तत्काळ पूर्वीसारखी परिस्थिती निर्माण करण्यास सांगितले होते. भूतानने हा आक्षेप येथील दूतावासामार्फत घेतला होता. डोंगलांग भागातील झोंपलरी येथील भूतानच्या लष्करी छावणीकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम चीनच्या लष्कराने नुकतेच सुरू केले. त्यामुळे दोन देशांतील (चीन व भूतान) कराराचे उल्लंघन होते, असे भूतानचे भारतातील राजदूत वेटसोप नामग्याल यांनी नवी दिल्लीत म्हटले होते. डोंगलांग हा चुम्बी खोऱ्यानजीक तीन सीमा एकत्र येणारा भाग असून, तो चीनच्या नियंत्रणात आहे. भूतानने त्या भागावर हक्क सांगितलेला आहे.
 

Web Title: Bhutan is not a happy country, but it is the Chinese media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.