शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

खबरदार! तैवानवर हल्ला केल्यास लष्करी कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2022 06:56 IST

बायडेन यांचा चीनला कठोर इशारा; विस्तवाचा आगीशी सामना

टोकियो : चीनने तैवानवर हल्ला केल्यास अमेरिका त्या देशाच्या रक्षणासाठी पूर्ण क्षमतेने उतरेल, अशा शब्दांमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष जाे बायडेन यांनी चीनला प्रथमच थेट इशारा दिला आहे. रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यानंतर तैवानच्या रक्षणाची जबाबदारी वाढल्याचे बायडेन यांनी स्पष्ट केले.क्वाड राष्ट्रांच्या बैठकीसाठी टोकियोमध्ये दाखल झाल्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी तैवानसंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिले. ते म्हणाले की, हाेय, आम्ही तसे आश्वासन दिले आहे. चीनने हल्ला केल्यास अमेरिका लष्करी कारवाईने तैवानच्या रक्षणासाठी उतरेल. तैवानच्या सीमेजवळ लढाऊ विमानांचे उड्डाण आणि घुसखाेरीसह इतर कारवाया करून चीन धाेक्याशी खेळत आहे. आम्ही ‘एक-चीन’ धाेरणावर स्वाक्षरी केली आहे, असे बायडेन म्हणाले 

nगेल्या काही दशकांमध्ये अमेरिकेच्या काेणत्याही राष्ट्राध्यक्षांनी केलेल्या आक्रमक वक्तव्यांपैकी हे एक वक्तव्य असल्याचे मानले जात आहे. nअमेरिकेने तैवानला संरक्षणाची अशा प्रकारची हमी देण्याचे आतापर्यंत टाळले आहे. अमेरिकेने १९७९ मध्ये तैवानसंबंधी कायदा केला आहे. मात्र, त्यानुसार सैन्य उतरवून तैवानचे रक्षण करण्याची गरज नाही. तसेच या कायद्यानुसार अमेरिकेकडून तैवानला शस्त्रास्त्रांचा पुरवठा करण्यात येताे. 

भीती वाढलीचीनने कायमच तैवानला आपला भूभाग असल्याचे म्हटले आहे, तर तैवान स्वत:ला स्वतंत्र देश मानताे. रशिया-युक्रेन युद्धानंतर चीन तैवानवर हल्ला करण्याची भीती वाढली आहे. तैवानवरून चीननेही अमेरिकेला विस्तवाशी खेळत असल्याचा इशारा यापूर्वी दिला हाेता.

ऑडिओ क्लिम व्हायरलनुकतीच एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली असून, यामध्ये वरिष्ठ चिनी अधिकारी तैवानवरील हल्ल्याबद्दल चर्चा करीत आहेत. ही चर्चा समोर आल्यानंतर बायडेन यांचे वक्तव्य आले आहे. त्यांनी म्हटले आहे की, रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर तैवानच्या सुरक्षेची जबाबदारी आणखी वाढली आहे. चीनने हल्ला केल्यास अमेरिका लष्करी मदत घेऊन तैवानचे रक्षण करील.

बळाचा वापर करून तैवानचा ताबा घेण्याचा विचार करणे अनुचित आहे. चीनने तसे पाऊल उचलल्यास ते चुकीचे ठरेल. तसेच संपूर्ण क्षेत्रामध्ये अस्थिरता निर्माण हाेईल,     - जो बायडेन, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष

चीनचा पलटवारबायडेन यांच्या वक्तव्यानंतर चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वांग वेनबिन म्हणाले की, आम्ही आमच्या राष्ट्रीय हिताचे रक्षण करू. राष्ट्रीय सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेचे रक्षण करण्याच्या चिनी लोकांच्या दृढनिश्चयाला आणि इच्छाशक्तीला कोणीही कमी लेखू नये. ते पुढे म्हणाले की, तैवान चीनचा भाग आहे. हा मुद्दा चीनचा अंतर्गत मुद्दा आहे. सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडतेच्या मूळ हितसंबंधित मुद्द्यांवर चीन कोणतीही तडजोड करणार नाही.

व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये काय आहे? ही क्लिप चीनच्या कम्युनिस्ट पार्टीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने लीक केली, ज्यांना शी जिनपिंग यांची तैवानवर हल्ला करण्याची योजना उघड करायची होती. अधिकारी या क्लिपमध्ये सांगत आहेत की, कोणत्या कंपन्यांना ड्रोन, बोटी बनवण्यासाठी उत्पादन क्षमता वाढवण्यास सांगितले आहे. याशिवाय हल्ल्याच्या तयारीवरही यात चर्चा झाली.

 

 

टॅग्स :chinaचीनAmericaअमेरिकाJoe Bidenज्यो बायडन