शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

‘नासा’च्या यशामागे भारतीय वंशाचे डॉ. जे. बॉब बलराम

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2021 04:43 IST

मंगळावर इंजिन्यूटी हेलिकॉप्टरचे ३० सेकंद उड्डाण

ह्यूस्टन : अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ने १९ एप्रिल रोजी मंगळ ग्रहावर इंजिन्यूटी हेलिकॉप्टर उडवून इतिहास घडविला. पहिल्यांदाच हे हेलिकॉप्टर किंवा रोटरक्राफ्टला पृथ्वीवरून नियंत्रित केले गेले. या हेलिकॉप्टरच्या मागे भारतीय वंशाचे वैज्ञानिक डॉ. जे. बॉब बलराम यांची बुद्धिमत्ता आहे. मूळचे दक्षिण भारतातील बलराम ‘नासा’च्या जेट प्रोपल्शन प्रयोगशाळेत काम करतात. बलराम यांनीच इंजिन्यूटी हेलिकॉप्टर बनविले असून, ते या मार्स हेलिकॉप्टर मोहिमेचे मुख्य अभियंताही आहेत.बलराम यांना विचारले गेले की, “मंगळ ग्रहावर इंजिन्यूटी हेलिकॉप्टर फक्त ३० सेकंदांसाठीच का उडाले? ३० सेकंदांचे उड्डाण घेतल्यानंतर इंजिन्यूटी हेलिकॉप्टर परत मंगळाच्या पृष्ठभागावर उतरले.” यावर बलराम यांनी सांगितले की, “मंगळाच्या वायुमंडळात कोणतीही वस्तू उतरवणे आणि उडवणे फार कठीण आहे. कारण तेथील वायुमंडळ पृथ्वीवर आहे तसे जड नाही. खूपच हलके आहे. या ३० सेकंदांच्या उड्डाणासाठी माझा ३५ वर्षांचा अनुभव आणि जगातील अनेक देशांतील वैज्ञानिकांची ऊर्जा कामी आली आहे.”

n    बलराम म्हणाले की, “ नासाकडून मंगळ ग्रहावर इंजिन्यूटी हेलिकॉप्टर उडवणे हे राइट ब्रदर्स यांच्या विमानाच्या पहिल्या उड्डाणासारखेच होते.”n    बलराम सध्या जेट प्रोपल्शन लॅबोरेटरीत काम करतात. ते म्हणाले, राइट बंधूंनी विमान तर फक्त १२ सेकंद उडवले होते. विमानाने पहिल्या उड्डाणात फक्त १२० फूट उंची गाठली होती. जे ३० सेकंद इंजिन्यूटी मंगळाच्या पृष्ठभागावर उडत होते तेव्हा श्वास थांबला असे वाटले.n    बॉब नासाच्या जेपीएलमध्ये ३५ वर्षांपासून रोबोटिक्स टेक्नोलॉजिस्ट आहेत. त्यांनी जे. कृष्णमूर्ती यांनी स्थापन केलेल्या ऋषी व्हॅली शाळेत शिक्षण घेतले. नंतर त्यांनी आयआयटीतून (मद्रास) मेकॅनिकल इंजिनिअरिंग पूर्ण केले. न्यूयॉर्कच्या रेनसिलर पॉलिटेक्निक इन्सिट्यूटमधून काॅम्प्युटर अँड सिस्टम इंजिनिअरिंगमध्ये पदवी मिळविली. 

टॅग्स :NASAनासा