शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
3
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
4
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
5
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
6
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
7
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
8
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
9
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
10
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
11
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
12
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
13
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
14
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
15
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
16
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
17
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
18
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
19
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
20
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?

शाही परिवाराच्या वागणुकीमुळे आत्महत्येचा विचार होता

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2021 02:14 IST

युवराज हॅरी यांच्या पत्नी मेगनने केला गौप्यस्फोट

लंडन : आमच्या मुलाचा रंग काळा असेल, अशी चिंता ब्रिटनच्या शाही परिवाराला लागली होती. या विचारांमुळे निराश होऊन माझ्या मनात आत्महत्येचे विचार घोळत होते, असा गौप्यस्फोट ब्रिटनचे युवराज हॅरी यांच्या पत्नी मेगन मर्केल यांनी केला आहे. मेगन यांचे वडील गौरवर्णीय व आई कृष्णवर्णीय आहे.प्रख्यात अमेरिकी सूत्रसंचालक ओपरा विन्फ्रे यांना मेगन व हॅरी यांनी नुकतीच एक मुलाखत दिली. त्यात मेगनने ब्रिटनच्या शाही परिवाराची अनेक गुपिते उघड केली आहेत. युवराज हॅरी व त्यांची पत्नी मेगन हे आता ब्रिटनच्या शाही परिवारापासून वेगळे झाले आहेत. हॅरी यांच्याशी मेगन यांचा २०१८ साली विवाह झाला व त्यांना आर्ची नावाचा एक वर्षे वयाचा मुलगा आहे.

मेगन यांनी सांगितले की, मी शाही परिवारातील मंडळींवर विश्वास ठेवला, ही सर्वात मोठी चूक होती. आमचा मुलगा आर्ची काळ्या रंगाचा निपजेल, अशी भीती वाटत असल्याने, शाही परिवाराने त्याला ‘युवराज’ म्हणून घोषित केले नव्हते. परिवारातील सदस्यांची ही मते मला युवराज हॅरी यांच्याकडून कळायची. प्रतिकूल मते व्यक्त करणाऱ्यांची नावे सांगण्यास मात्र मेगन मर्केल यांनी नकार दिला. युवराज विल्यम यांची पत्नी केट मिडल्टन यांच्याशी कोणताही वाद झाला नसल्याचेही मेगन यांनी स्पष्ट केले. या मुलाखतीवर ब्रिटनच्या राजघराण्याने काहीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. 

वडील माझा फोनही घेत नव्हतेयुवराज हॅरी म्हणाले की, ब्रिटनच्या शाही परिवाराने आमच्याशी आर्थिक संबंध तोडले. त्यानंतर, वडील युवराज प्रिन्स यांनी माझे फोनही घेणे बंद केले. शाही परिवाराने आम्हाला सतत कमी लेखले.

टॅग्स :Londonलंडन