शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
3
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
4
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
5
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
6
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
7
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
8
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
9
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
10
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
11
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
12
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
13
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
14
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
15
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
16
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
17
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
18
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
19
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

'या' देशाच्या राष्ट्राध्यक्षपदी फुटबॉलपटू झाला विराजमान

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2018 6:01 PM

माजी फुटबॉलपटू जॉर्ज विआ यांची लायबेरिया देशाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. 2002नंतर फुटबॉलला राम राम ठोकल्यानंतर जॉर्ज विआ हे राजकारणात सक्रिय झाले. ते लायबेरियाच्या संसदेत सिनेटरही आहेत.

मोनरोव्हिया- माजी फुटबॉलपटू जॉर्ज विआ यांची लायबेरिया देशाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. 2002नंतर फुटबॉलला राम राम ठोकल्यानंतर जॉर्ज विआ हे राजकारणात सक्रिय झाले. ते लायबेरियाच्या संसदेत सिनेटरही आहेत. 26 डिसेंबर 2017 रोजी लायबेरियात राष्ट्राध्यक्षपदासाठी निवडणूक झाली होती. या निवडणुकीत प्रतिस्पर्धी असलेल्या जोसेफ बोआकाई यांचा पराभव करत जॉर्ज यांनी त्यांच्याहून 60 टक्के जास्त मते मिळवली.जॉर्ज विआ निवडणूक जिंकल्यानंतर मोनरोव्हियामध्ये एकच जल्लोष करण्यात आला होता. जॉर्ज विआ यांनी आज लायबेरियाच्या राष्ट्राध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला आहे. जॉर्ज विआ यांनी माजी राष्ट्राध्यक्ष एलेन जॉन्सन यांची जागा घेतली आहेत. निवडणुकीतील विजयानंतर जॉर्ज यांनी ट्विटरवरून आनंदही व्यक्त केला आहे. त्यानंतर ते जनतेला उद्देशून म्हणाले होते, लायबेरियाच्या विकासासाठी आपण एकत्र काम करण्याची गरज आहे.जगाला लायबेरियाची खरी क्षमता दाखवून देण्याची ही उत्तम संधी आहे. आफ्रिकन आणि आंतरराष्ट्रीय नेते आणि भागीदारांसाठी आता लायबेरियाचे दरवाजे खुले झाले आहेत. माझ्याकडे लायबेरियाला प्रगतिपथावर नेण्यासाठी अनेक योजना आहेत. त्यामुळे आता सकारात्मक विचारांसह लायबेरियाला प्रगतीच्या मार्गावर नेण्यासाठी तयार राहा.

टॅग्स :Footballफुटबॉल