शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
2
पाकिस्तानचा हा कट्टर शत्रू तयार करतोय आत्मघातकी ड्रोनची फौज; इस्लामाबाद असो वा कराची, क्षणात होईल माती-माती!
3
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूर्वी कॅनडात खलिस्तानवाद्यांवर जोरदार कारवाई, अनेकांना अटक...
4
Raj Kushwaha : "सोनम वयाने मोठी, बॉस होती, राज फक्त नोकर"; आईने घेतली लेकाची बाजू, म्हणाली...
5
विशेष लेख: मोठ्या पवारांची भाजपच्या दारावर टकटक?
6
'PM मोदींनी आपला हट्टीपणा सोडावा', असीम मुनीरच्या अमेरिका दौऱ्यावरुन काँग्रेसची टीका
7
आजचा अग्रलेख - किती मुले केव्हा? की नकोच?
8
राज कुशवाह तर मोहरा, सोनमचं खरं प्रेम कुणीतरी दुसरंच...? राजा रघुवंशी प्रकरणात नवा 'ट्विस्ट'
9
अंबानींना टक्कर देऊ शकतील का मस्क? स्टारलिंकच्या इंटरनेटच्या किंमतीवरूनच येईल अंदाज
10
जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाने केळी बागांना तडाखा; मोठे वृक्ष उन्मळून पडले, रस्ता रात्री ९ पासून बंद
11
प्राजक्ताच्या 'मदनमंजिरी'वर युरोपीयन्सचा डान्स, लावणीवर महिलांसह पुरुषांनीही धरला ठेका, अभिनेत्री म्हणाली...
12
भारतासोबत अतिशय घाणेरडा खेळ...! आसिम मुनीरच्या प्रेमात पडली अमेरिका, हे काय बोलले टॉप लष्करी कमांडर...?
13
३००० रुपयांवरील UPI पेमेंट वर शुल्क लागणार का, सरकारनं काय म्हटलं? जाणून घ्या डिटेल्स
14
आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी : पंढरीच्या वाटेत दर पाच किलोमीटरवर आपला दवाखाना, दहा खाटांचे आयसीयू
15
मालाडमध्ये मांजरीसोबत अमानुष प्रकार, संतापजनक घटनेचा व्हिडीओ समोर!
16
RCB वर मोठी कारवाई होणार? BCCI बैठकीत काय निर्णय घेणार? समोर आली खास अपडेट
17
निवृत्तीचे वय ६० करण्यास होतोय विरोध, दुसरीकडे ६५ पर्यंत काम करण्याची मुभा
18
मुंबईत १६ वर्षाच्या मुलीवर अत्याचार, गर्भवती राहिल्यानंतर धक्कादायक प्रकार उघड, गुन्हा दाखल
19
Swami Samartha: राग, चिडचिड, नैराश्य घालवण्याचा रामबाण उपाय म्हणजे 'हा' स्वामी संदेश!
20
हूल दिलेल्या मान्सूनची पुन्हा चाहूल; राज्यभर ऑरेंज अलर्ट, धो धो बरसणार

‘बॅटवूमन’ने शोधला वटवाघळ कोरोना विषाणू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2025 05:54 IST

शी झेंगली यांनी बॅट कोरोना व्हायरसवर बरेच संशोधन केले असल्याने त्या ‘बॅटवूमन’ म्हणून प्रसिद्ध आहेत. 

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : चिनी संशोधकांनी वटवाघळातील नवीन कोरोना विषाणू शोधला आहे. त्यात मानवांना संक्रमित करण्याची क्षमता असू शकते. हा विषाणू कोविड-१९ पसरवणाऱ्या सार्स-सीओव्ही-२ विषाणूमध्ये असलेल्या प्रथिनांचा वापर करून पेशींमध्ये प्रवेश करतो.या नवीन विषाणूवरील अभ्यास सेल सायंटिफिक जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे. हे संशोधन ग्वांगझू प्रयोगशाळेतील शी झेंगली आणि त्यांच्या टीमने केले आहे. शी झेंगली यांनी बॅट कोरोना व्हायरसवर बरेच संशोधन केले असल्याने त्या ‘बॅटवूमन’ म्हणून प्रसिद्ध आहेत. 

विषाणू मानवासाठी किती घातक ?चीनमध्ये वटवाघळांमध्ये एचकेयू५-सीओव्ही-२ आढळला आहे. यांच्यात मानवांना संक्रमित करण्याची क्षमता असली, तरी तो प्राण्यांपासून थेट मानवांमध्ये पसरू शकतो की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. जरी जंगलात शेकडो कोरोना व्हायरस अस्तित्वात असले, तरी त्यापैकी फक्त काही मानवांना संक्रमित करण्यास सक्षम आहेत.

‘बॅटवूमन’चे संशोधन काय म्हणते...हे संशोधन चीनच्या शी झेंगली आणि त्यांच्या टीमने ग्वांगझू अकादमी ऑफ सायन्सेस, वुहान विद्यापीठ आणि वुहान इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीच्या शास्त्रज्ञांच्या सहकार्याने केले आहे.शास्त्रज्ञांच्या मते, एचकेयू५-सीओव्ही-२ मध्येदेखील ‘फ्युरिन क्लीवेज साइट’सारखेच वैशिष्ट्य आहे, ज्यामुळे ते एसीई२ प्रथिनाद्वारे मानवी पेशींमध्ये प्रवेश करू शकते.मात्र, एचकेयू५-सीओव्ही-२ मानवी पेशींमध्ये तितक्या सहजपणे प्रवेश करत नाही, जितका सार्स-सीओव्ही-२, कोविड-१९ पसरवणारा विषाणू करू शकतो.प्रयोगशाळेत केलेल्या चाचण्यांमध्ये असे आढळून आले की, हा विषाणू उच्च-एसीई२ पातळी असलेल्या मानवी पेशींना विशेषतः आतड्याच्या आणि श्वसनमार्गाच्या पेशींना संक्रमित करू शकतो. हा विषाणू मानवामध्ये इतक्या लवकर पसरणार नाही. त्यामुळे याबद्दल जास्त घाबरण्याची गरज नाही.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या